-
खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे कधी राजकीय, सामाजिक तर कधी चित्रपटांमुळे चर्चेत असतात.
-
काही दिवसांपूर्वीच त्यांचा बहुचर्चित ‘शिवप्रताप-गरुडझेप’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक केले गेले.
-
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेचा थरार पाहायला मिळाला.
-
डॉ. अमोल कोल्हे यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अनेकदा ते त्यांच्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करत असतात.
-
डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतचं एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी काही फोटो शेअर केले असून ते पुस्तक वाचन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
“वेळेचा सदुपयोग! काल माझा मित्र वैभव शेटकर याने हे पुस्तक भेट दिलं…मित्र मनातलं ओळखतात की काय”, असे त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
-
“पण सक्तीची विश्रांती सत्कारणी लावण्याची सोय झाली.. पुस्तकाविषयी व्हिडिओ लवकरच…”, असेही त्यांनी म्हटले आहे.
-
अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्या मानेला दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात त्यांनी मानेसाठी पट्टा लावल्याचे दिसत आहे.
-
त्यांच्या या फोटोवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ‘मानेची काळजी घ्या अमोलजी !’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दुखापतीमुळे अमोल कोल्हे सक्तीच्या विश्रांतीवर, तेजस्विनी पंडितने फोटोवर केलेली कमेंट चर्चेत
“पण सक्तीची विश्रांती सत्कारणी लावण्याची सोय झाली..” असे अमोल कोल्हे म्हणाले.
Web Title: Dr amol kolhe share instagram post reading books tejaswini pandit comment said take care nrp