अमोल रामसिंग कोल्हे (Amol Kolhe) हे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मनोरंजन क्षेत्रानंतर राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शिरूर मतदारसंघातून खासदार आहेत. विशेष म्हणजे अमोल कोल्हे हे शिक्षणाने एमबीबीएस डॉक्टर आहेत.
मात्र, पुढे त्यांच्या अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी मनोरंजन क्षेत्रात करियर केलं. स्टार प्रवाहच्या राजा शिवछत्रपती या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. त्यांची राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून झाली.
<br />
२०१४ मध्ये ते शिवसेनेचे (Shivsena) स्टार कॅम्पेनर होते. पुढे फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०१९ च्या लोकसभेत त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव करत लोकसभेत गेले. Read More
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदार संघाची बैठक आज पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार…