-
युट्यूबचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या भुवन बामने ओटीटी विश्वात दमदार पदार्पण केलं आहे.
-
हॉटस्टारवरील ‘ताजा खबर’ या वेबसीरिजमधून भुवनने ओटीटीमध्ये एंट्री घेतली आहे.
-
बऱ्याच प्रेक्षकांना भुवनची ही सीरिज आणि त्यातील त्याचं काम आवडलं आहे.
-
भुवनला देशभरातच नव्हे तर जगभरात लोकप्रियता मिळाली ती त्याच्या ‘बीबी की वाईन्स’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून.
-
युट्यूब व्हिडिओच्या आधी भुवन रेस्टोरंटमध्ये गायचा, याबरोबरच तो फेसबुकवर विनोदी व्हिडिओजसुद्धा बनवायचा.
-
२०१५ मध्ये त्याने त्याचे चॅनल ‘बीबी की वाईन्स’ सुरू केलं आणि मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही.
-
भुवन हा एक उत्तम गीतकार आणि गायकही आहे. त्याचे म्युझिक व्हिडिओसुद्धा चांगलेच हीट झाले आहेत.
-
२०२१ मध्ये कोविडमुळे भुवनच्या आई वडिलांचे निधन झाले. भुवन त्यांच्या फार जवळचा होता, भुवनला प्रत्येक गोष्टीत त्याच्या आई वडिलांना भरपूर प्रोत्साहन दिलं.
-
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भुवनने तो युट्यूबच्या माध्यमातून बक्कळ पैसे कमावतो हे कबूल केलं होतं.
-
त्याचं चॅनल ‘बीबी की वाईन्स’चे तब्बल २५.७ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.
-
भुवनची आत्ताची संपत्ती तब्बल ३० कोटी इतकी आहे.
-
शिवाय भुवन यूट्यूबच्या माध्यमातून वर्षाला ४ कोटी आणि महिन्याला २५ लाख एवढी कमाई सहज करतो. (फोटो सौजन्य : भुवन बाम / इन्स्टाग्राम)
हॉटेलमध्ये गाणं गाणारा ते लोकप्रिय युट्यूबर; ओटीटीवर झळकणारा भुवन बाम कमावतो ‘इतके’ कोटी
हॉटस्टारवरील ‘ताजा खबर’ या वेबसीरिजमधून भुवनने ओटीटीमध्ये एंट्री घेतली
Web Title: Journey of bhuvan bam from youtube to ott star and how much he earns from youtube avn