-
रेखा यांनी ४ मार्च १९९० रोजी दिल्लीस्थित उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर ६ महिन्यांनी मुकेश अग्रवाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
-
मुकेशच्या मृत्यूनंतर रेखा यांना त्यांच्या आत्महत्येस जबाबदार धरण्यात आलं होतं. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीतही रेखापासून अनेक जण दूर झाले होते.
-
अखेर रेखाने आपल्यावर लावण्यात आलेल्या या आरोपावर स्पष्टीकरण दिले होते.
-
मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी रेखाने फिल्मफेअरला मुलाखत दिली आणि आपली बाजू मांडली. या मुलाखतीचे शीर्षक होते ‘मी मुकेशला मारले नाही’.
-
मला माझे चाहते, मित्र, नातेवाईक आणि माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या लोकांना सत्य कळावं, असं वाटतं म्हणून मी ही मुलाखत देत आहे.
-
पहिली गोष्ट म्हणजे मुकेशला घटस्फोट घ्यायचा होता, मला नाही. त्यांनीच हा प्रस्ताव मांडला होता. मला आमच्या स्वभावातील फरक जाणवू लागला होता, असं रेखा यांनी सांगितलं होतं.
-
कदाचित माझी अरेंज्ड मॅरेजची इच्छा चुकीची होती. पण यानंतरही मला हार मानायची नव्हती. जर दोन लोकांचा असा विश्वास असेल की ते एकमेकांसाठी बनलेले नाहीत, तर त्यांनी वेगळं व्हायला पाहिजे, या मताची मी आहे.
-
मी अशा लोकांपैकी नाही जे आपले न टिकलेले लग्न यशस्वी दिसावे यासाठी प्रयत्न करतात, असं रेखा म्हणाल्या होत्या.
-
‘मला गोष्टी अतिशय सकारात्मक पद्धतीने सेट करायच्या होत्या पण मी कदाचित विसरले होते की एखादं नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी मेहनत घ्यावी लागते. पण यातलं काही घडलं नाही तेव्हा आम्ही दोघांनी मित्र राहण्याचा निर्णय घेतला,” असं रेखा म्हणाल्या होत्या.
-
मुकेशने आत्महत्येसाठी वापरलेला दुपट्टा रेखाचा असल्याची बातमी पसरली. त्यामुळे रेखा यांना मुकेश यांच्या आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं.
-
मात्र, रेखा यांनी असे दावे फेटाळून लावले आणि म्हणाल्या की, “लोकांनी तो दुपट्टा माझाच असल्याचा निष्कर्ष कसा काय काढला. त्यावर माझे नाव लिहिले होते का? यावरून मीच मुकेशला मारलं हे सिद्ध करण्याचा लोकांचा प्रयत्न होता असं दिसून येतं.”
-
(फोटो – सोशल मीडिया आणि इंडियन एक्सप्रेसवरून साभार)
लग्नानंतर सहा महिन्यांत पतीचा गळफास; आत्महत्येस जबाबदार ठरवल्यावर रेखा म्हणाल्या होत्या, “मी मुकेशला…”
लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत रेखा यांच्या पतीने केलेली आत्महत्या, आरोप झाल्यावर अभिनेत्रीने मुलाखतीत दिलेलं उत्तर
Web Title: Rekha husband mukesh agarwal suicide know how she defended herself and her relation with husband hrc