-
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच काही ना कारणांमुळे चर्चेत असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
कधी तिच्या वक्तव्यांमुळे तर कधी कंगनाचा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे ती चर्चेचा विषय बनते.
-
कंगनाने नुकतंच तिच्या मनालीतील घराचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
सध्या मनालीमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत आहे.
-
या बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते, घरं आणि आजूबाजूचा परिसर हा बर्फाने झाकला गेला आहे.
-
कंगनाने शेअर केलेल्या नव्या घराचे फोटोत तिच्या घराबाहेर बर्फवृष्टी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
तिच्या घराच्या बाहेर, छतावर बर्फ पाहायला मिळत आहे.
-
कंगना ही सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
-
कंगनाने तिच्या मनालीतील बर्फाच्छादित बंगल्याची आकर्षक छायाचित्रे शेअर करत त्याची आठवण येत असल्याचे सांगितले आहे.
-
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीला कॅप्शन देताना म्हटले की, “यंदाचा हिवाळा ऋतू घरात आईने बनवलेले तीळ/हळदीचे लाडू न खाल्ल्याशिवाय जाणार.”
-
कंगनाने काही दिवसांपूर्वी या घराचे इनसाईड फोटोही शेअर केले आहे.
-
कंगनाच्या मनालीतील घरात विटांचा वापर न करता दगड, लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे.
-
तिने तिच्या घराला प्राचीन आणि पारंपारिक रुप दिलं आहे.
-
तिने तिच्या घराचे इंटेरियरही पुरातन पद्धतीने केलं आहे.
-
कंगनाच्या घरातील बेडरूमही अगदी प्रशस्त आहे.
-
तिने तिच्या घरातील एक भिंत खास फोटोंनी सजवून घेतली आहे.
-
कंगनाने शेअर केलेले आलिशान घराचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कंगना रणौतच्या घराबाहेर बर्फवृष्टी, फोटो शेअर करत म्हणाली…
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कंगना रणौतच्या घराबाहेर बर्फवृष्टी
Web Title: Kangana ranaut shared pictures of her manali house after snowfall nrp