-
मराठातील बोल्ड व बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर आता दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. लवकरच ती अभिनेता सलमान दुलकीरबरोबर एका मल्याळम चित्रपटात दिसणार आहे. बिजॉय नाम्बियार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सईने हिंदी चित्रपटातदेखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
अभिनेत्री आणि आता निर्माती म्हणून ओळख असलेली श्रुती मराठेनेदेखील मराठी चित्रपटांप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.
-
‘इंदिरा विझा’ या तामिळ चित्रपटात तिने काम केले असून या चित्रपटात नासिर, राधा रवी, रागसया आदी कलाकार होते. तसेच तिने आणखीन काही दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे
-
नेहा पेंडसेने आजवर मालिका चित्रपट अशा अनेक माध्यमांमध्ये काम केले आहे. मराठीच्याबरोबरीने तिने हिंदीत काम केले आहे.
-
नेहानेदेखील ‘सोनाथम’ या तेलगू चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात आर्यन राजेश, रोहित, सुनील आणि नमिता यांच्या प्रमुख भूमिका आहेत
-
अभिनेत्री भाग्यश्री मोटे बोल्ड लूकमुळे कायमच चर्चेत असते. तिने ‘शोधू कुठे’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले.
-
भाग्यश्रीने मराठीच नव्हे तर तेलगू चित्रपट ‘चिकाटी गाडीलो चिथाकोतुडू’ यातदेखील काम केले आहे.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अर्थात सो कुल बॉलिवूडप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्ये सक्रीय असते.
-
सोनालीने आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच गिरीश कर्नाड यांच्या ‘चेलुवी’ या कन्नड चित्रपटात काम केले होते. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
बॉलिवूडप्रमाणेच ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचा दाक्षिणात्य चित्रपटात डंका; पाहा फोटो
आज अनेक प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते आहेत. मराठमोळ्या अभिनेत्रींनादेखील या चित्रपटांची भुरळ पडली आहे
Web Title: Photos shruti marathi to sai tamhankar these marathi actress who featured in south indian films spg