-
आपल्या भारदस्त आवाजासाठी आणि दमदार अभिनय आणि व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर.
-
‘हर हर महादेव’ या चित्रपटात शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती.
-
तर ‘तान्हाजी’ चित्रपटातील त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.
-
जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील प्रभासला हिंदीत आवाज शरद केळकरने दिला होता.
-
आता लवकरच शरद केळकरचा ‘चोर निकाल के भागा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
या निमित्ताने त्याने दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाविषयी आणि पत्नीविषयी भाष्य केलं आहे.
-
शरद केळकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो.
-
तो अनेकदा कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करत असतो.
-
त्याबरोबर तो अनेकदा पत्नीबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
-
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत शरद केळकरला “चित्रपटासाठी तू पत्नीचा सल्ला घेतोस का?” असे विचारले.
-
त्यावेळी तो म्हणाला, “माझी पत्नी (कीर्ती) नेहमीच मला आयडिया देत असते.”
-
“मी माझ्या स्क्रिप्ट्स तिला वाचून दाखवतो.”
-
“जर तिला त्या आवडल्या नाहीत, तर मी ते करत नाही.”
-
“मी तिला फक्त मला आवडलेल्या गोष्टी सांगतो.”
-
“हा एक थ्रिलर चित्रपट आहे.”
-
“हिस्ट आणि हायजॅक यावर चित्रपटाची गोष्ट बेतली आहे.”
-
“चोर कोण आहे हे कोणालाच माहीत नाही.”
-
“मी चोर आहे की नाही त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.”
-
“हा चित्रपट मुलेदेखील पाहू शकतील.”
-
“हा एक वेगवान आणि मनोरंजक चित्रपट आहे. कथेचा अंदाज येत नाही”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
-
‘चोर निकाल के भागा’ हा चित्रपट येत्या २४ मार्चला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
शरद केळकर चित्रपटाची निवड कशी करतो? गुपित उघड करत म्हणाला “ती व्यक्ती…”
“जर तिला त्या आवडल्या नाहीत, तर मी ते करत नाही.”
Web Title: How sharad kelkar select the movie script reveal the secret during interview nrp