-
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला ओळखले जाते.
-
या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर फुलराणी मराठी चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शिनीने ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’साठी ऑडिशनदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.
-
नुकतंच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने महाराष्ट्राच्या हास्यजत्रेसाठी मला नकार मिळाला होता, असा खुलासा केला.
-
त्यावेळी तिच्या आईने तिला हास्यजत्रेत संधी कशी मिळाली? याबद्दल सांगितले आहे.
-
“अफलातून लिटील मास्टर्समध्ये असताना एका निर्मात्याने अचानक मला फोन केला.”
-
“त्यावेळी त्यांनी मला प्रियदर्शिनी ही सध्या काय करते”, असे विचारले होते.
-
“तर तेव्हा मी त्यांना सध्या ती अनबॉक्स नावाची नाट्यसंस्था आहे.”
-
“त्यात ती विविध नाटक सादर करते, भाग घेते आणि बक्षीस मिळवते वैगरे असं सांगितलं.”
-
“त्यावेळी त्यांनी मला तिला हास्यजत्रेच्या ऑडिशनसाठी पाठवा ना तिला? असे सांगितले.”
-
“मग मी प्रियदर्शिनीच्या मागे लागून लागून ते म्हणतात, तर जाऊन ऑडिशन देऊन ये असं करुन मी तिला पाठवलं.”
-
त्यावेळी तिची निवड झाली”, असे तिच्या आईने सांगितले.
-
त्यानंतर प्रियदर्शिनीने तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
-
“मी हास्यजत्रेच्या सुरुवातीला एकदा ऑडिशन दिले होते.”
-
“त्यावेळी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये सर्व सिनीअर कलाकार होते.”
-
“त्या ऑडिशनवर त्यांनी मला नाटकाची ऑफर दिली होती.”
-
“आमच्या ‘ही’ च प्रकरण” हे त्यांचं नाटक होतं. त्यात मी १०० व्या प्रयोगानंतर रिप्लेसमेंटचं काम केलं होतं.”
-
“त्याचे प्रयोग झाल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सीझनच्या ऑडिशन सुरु झाल्या. त्यानंतर मग हा प्रवास सुरु झाला.”
-
“तेव्हा मला आणि शिवालीला तेव्हा सिझनच्या शेवटी खास बक्षीस मिळालं होतं”, असे प्रियदर्शिनी म्हणाली.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी प्रियदर्शिनी इंदलकरला देण्यात आलेला नकार, कारण…
“त्या ऑडिशनवर त्यांनी मला नाटकाची ऑफर दिली होती.”
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshani indalkar i was rejected by director sachin goswami nrp