-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत.
-
बॉलिवूडचे व्हिलन अशी ओळख असलेले आशिष विद्यार्थी यांनी ६०व्या वर्षी पुन्हा विवाह केला आहे.
-
आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
-
आशिष व रुपाली यांनी गुरुवारी (२५ मे) कोलकाता येथे कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज पद्धतीने विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
आसाममधील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय फॅशन डिझायनर रुपाली बरुआसोबत आशिष यांनी लग्न केले आहे. यानंतर त्यांची पहिली पत्नी राजोशी म्हणजेच पीलू विद्यार्थी प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
-
राजोशीने इंस्टाग्रामवर काही पोस्ट केल्या आहेत. यामुळे त्या या बातम्यांमुळे तुटलेल्या आहेत आणि स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
-
नुकताच त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक हसतमुख फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत राजोशी यांनी लिहिले, ‘आयुष्याच्या कोड्यात अडकू नका, हेच जीवन आहे.’
-
राजोशी या बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची मुलगी आहे. कदाचित यामुळेच त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती.
-
त्यांनी १९९३ मध्ये रेडिओ जॉकी आणि निर्माता म्हणून करिअरला सुरुवात केली.
-
राजोशी यांना अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
अभिनेत्रीने ‘सुहानी सी एक लडकी’, ‘गुड सा मीठा इश्क’ आणि ‘इमली’ सारख्या टीव्ही शोमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अलीकडेच त्या २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द बॉडी’ या हिंदी चित्रपटात दिसल्या होत्या.
-
आशिष विद्यार्थी आणि राजोशी यांना अर्थ विद्यार्थी नावाचा २३ वर्षांचा मुलगा देखील आहे. तो youtuber आहे. (Photos: Instagram)
आशिष विद्यार्थी यांच्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची झाली अशी अवस्था; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “आयुष्याच्या कोड्यात…”
आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांची पहिली पत्नी राजोशी म्हणजेच पीलू विद्यार्थी प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
Web Title: After the second marriage of ashish vidyarthi the first wife is heart broken shared emotional post on instagram pvp