-
संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपट १९ जुलै २०१३ रोजी प्रदर्शित झाला.
-
‘दुनियादारी’ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच बॉक्स ऑफिसवर सुद्धा या चित्रपटाने चांगले यश मिळवले.
-
‘दुनियादारी’ला १० वर्ष पूर्ण झाल्याने चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या सई ताम्हणकरने यातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांसह खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘दुनियादारी’ चित्रपटात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
-
सईने या चित्रपटात ‘शिरीन’ या पात्राची भूमिका साकारली होती.
-
चित्रपटाचे कथानक प्रसिद्ध मराठी साहित्यिक सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ कादंबरीवर आधारित होते.
-
‘दुनियादारी’ चित्रपटाला तरुणपिढीची विशेष पसंती मिळाली.
-
चित्रपटातील बरेच संवाद आणि सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत.
-
सईने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी कमेंट करून “पुढचा भाग कधी येणार? लवकरात लवकरत रिलीज करा” अशी मागणी करत आहेत.
-
‘दुनियादारी’ चित्रपटात प्रेक्षकांना रेट्रो फॅशन पाहायला मिळाली होती.
-
चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्याने कलाकारांनी पुन्हा एकदा रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
रेट्रो लूक आणि ९० च्या दशकातील स्टाईल, ‘दुनियादारी’ चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाल्यावर सई ताम्हणकरने शेअर केले खास फोटो
सई ताम्हणकरने ‘दुनियादारी’ चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकासह शेअर केले खास फोटो
Web Title: Sai tamhankar shared beatiful photos with duniyadari movie cast and director sva 00