-
आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता मंगेश देसाई ‘अंकुश’ या चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहे.
-
‘साजनभाई’ असं नाव असलेल्या या भूमिकेतील रावडी लूक लाँच करण्यात आला असून ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले ‘अंकुश’ या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत.
-
‘अंकुश’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
-
‘अंकुश’ चित्रपटाचा थरारक टीजर नुकताच लाँच करण्यात आला.
-
या टीजरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
-
या चित्रपटात केतकी माटेगावकर एका करारी भूमिकेत दिसणार आहे.
-
केतकीसह आता मंगेश देसाईच्या ‘साजनभाई’ या भूमिकेचा रावडी लूक समोर आला आहे.
-
मंगेश देसाईनं आजवर त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका आपल्या सशक्त अभिनयानं सजवली आहे.
-
त्यामुळेच मराठीतील कसदार अभिनेत्यांमध्ये मंगेशचं नाव आवर्जून घेतलं जातं.
-
मल्टिस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटातून अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेता मंगेश देसाई यांच्यामुळे ‘अंकुश’ चित्रपटातील एकाहून एक सरस कलाकार आता समोर येऊ लागले आहेत.
-
त्यामुळे चित्रपटाविषयीचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मंगेश देसाई / इन्स्टाग्राम)
Photos: मंगेश देसाईच्या रावडी लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; फोटो व्हायरल
या टीजरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
Web Title: Marathi actor mangesh desai upcoming movie ankush rowdy look seeking attention on social media photos sdn