-
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत ७० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
-
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे सुंदर कथानक वैशाली नाईक हिने लिहिले आहे.
-
चित्रपटाची कथा कशी सुचली? याबद्दल वैशाली नाईकने अलीकडेच खुलासा केला आहे.
-
वैशाली म्हणाली, “ही कथा मी माझी आई सेवानिवृत्त झाल्यावर २०१८ मध्ये लिहिली होती. माझ्या आईच्या सहा बहिणी आहेत त्यामुळे मला ही कथा सुचली. लहानपणापासून मी त्यांचे असंख्य किस्से ऐकले होते.”
-
“मी गिरगावची असल्याने मला परंपरा, सण याविषयी माहिती होते. आई सेवानिवृत्त झाल्यावर तिच्यासमोर प्रश्न होता आता पुढे करायचे?”
-
“आईसारख्या त्या विशिष्ट वयातील बायकांना एका काळानंतर वाटू लागते आता कोणालाच आपली गरज नाही.”
-
“आईमुळे या सगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि माझ्या जीवनप्रवासात मला ‘बाईपण भारी देवा’ची कथा सुचली.” असे वैशालीने सांगितले.
-
ओमकार, केतन, निकिता या माझ्या टीमबरोबर बसून ही कथा पूर्ण केल्याचे वैशालीने नमूद केले.
-
प्रत्यक्षात आलेल्या अनुभवांचे लेखन केल्यामुळे हा चित्रपट सर्वांना जवळचा वाटला असेही वैशाली म्हणाली. दरम्यान, या सुंदर कथेसाठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्रींनीही वैशालीचे विशेष कौतुक केले आहे.
“गिरगावमधील बालपण, सेवानिवृत्त आई अन्…”, ‘त्या’ सहा जणींमुळे लेखिकेला सुचले ‘बाईपण भारी देवा’चे कथानक
लेखिका वैशाली नाईकला कशी सुचली ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची कथा?
Web Title: Baipan bhari deva writer vaishali naik shared old photos and reveals about script sva 00