Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gashmeer mahajani says bank wanted to seal his house after father ravindra mahajani debt hrc

“बँकेचे लोक पाहून भीती वाटायची,” गश्मीर महाजनीने सांगितली आठवण; म्हणाला, “मी रात्री रस्त्यावर पोस्टर…”

अवघ्या १५ वर्षाच्या गश्मीरला आईबरोबर सोडून रवींद्र महाजनींनी सोडलेलं घर, तेव्हाची आठवण सांगत गश्मीर म्हणाला…

Updated: August 30, 2023 15:05 IST
Follow Us
  • gashmeer mahajani
    1/24

    लोकप्रिय मराठी अभिनेता गश्मीर महाजनी सध्या चांगलाच चर्चेत आहे.

  • 2/24

    त्याचं कारण म्हणजे त्याचे वडील व ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन होय.

  • 3/24

    ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं दीड महिन्यापूर्वी निधन झालं. ते त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले होते. 

  • 4/24

    ते एकटेच राहत होते, कुटुंबीय सोबत नव्हते, मुलगा गश्मीरही त्यांच्याबरोबर नव्हता, यावरून गश्मीरला प्रचंड ट्रोल केलं गेलं. 

  • 5/24

    आता गश्मीरने मुलाखत दिली आणि त्याची बाजू मांडली. 

  • 6/24

    ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गश्मीरने त्याच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं.

  • 7/24

    तसेच त्याने वडिलांवर कर्ज असताना ते त्याला व त्याच्या आईला सोडून वेगळे राहायला निघून गेले, याबाबतही खुलासा केला.

  • 8/24

    मी १५ वर्षांचा होतो, माझी दहावी झाली होती आणि त्यावेळी कळलं की त्यांच्यावर (वडिलांवर) कर्ज आहे. त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला. – गश्मीर महाजनी

  • 9/24

     घर आईच्या नावाने होतं, ते म्हणाले की आता तुम्ही तुमचं बघा. मी १५ वर्षांचा आणि सोबत एकटीच आई. – गश्मीर महाजनी

  • 10/24

    बँकेच्या रिकव्हरी डिपार्टमेंटची लोकं पाहून भीती वाटायची. ते सगळे एकदम घरी आले, घर सील करणार, नोटीस लावणार असं ते म्हणू लागले. – गश्मीर महाजनी

  • 11/24

     आम्ही बँकेत जाऊन त्यांच्या हाता-पाया पडून सांगितलं की बाबा नसले तरी आम्ही कर्ज फेडू. जर तुम्ही घर जप्त केलं तर आम्ही जाणार कुठे, आम्ही कर्ज फेडू शकणार नाही. मग बँकेने आम्हाला हप्ते ठरवून दिले. – गश्मीर महाजनी

  • 12/24

    मी रात्री जाऊन रस्त्यावर पोस्टर लावायचो. १५-१६ वर्षांचा मुलगा रात्री पोस्टर्स लावतोय, हे पाहून पोलिसांनी पडकलं तर, अशी काळजी आईला वाटायची.- गश्मीर महाजनी

  • 13/24

    . मग ती येऊन रस्त्यावर थांबायची. सोबत वयस्कर बाई आहे म्हटल्यावर तुला प्रॉब्लेम येणार नाही, असं ती म्हणायची.  – गश्मीर महाजनी

  • 14/24

    इथून मी सुरुवात केली, नंतर इव्हेंट्स मिळवले, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. डान्सची संस्था सुरू केली. – गश्मीर महाजनी

  • 15/24

    मला कॉर्पोरेट इव्हेंट्समधून पैसा मिळाला. त्याची कर्ज फेडण्यात मदत झाली.- गश्मीर महाजनी

  • 16/24

    आपण तब्बल सहा वर्षे पैसा कमवून वडिलांचं कर्ज फेडल्याचं गश्मीर सांगतो.

  • 17/24

    मी वयाची १५ ते २१ कर्ज फेडत होतो. – गश्मीर महाजनी

  • 18/24

    कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर मी आईला म्हणालो होतो की आता पुढच्या इव्हेंटची मी वाट पाहतोय कारण सहा वर्षात पहिल्यांदा मी कमावलेला पैसा कुणालाच द्यायचा नाही. – गश्मीर महाजनी

  • 19/24

    सहा वर्षे मी कमावलेले पैसे फक्त बघायचो आणि कर्ज फेडण्यासाठी देऊन द्यायचो. – गश्मीर महाजनी

  • 20/24

    आम्ही मान मोडून काम केलं. – गश्मीर महाजनी

  • 21/24

    आता माझ्याकडे BMW आहे, मोठा फ्लॅट आहे तर बापामुळेच झालं असणार असं लोक बोलतात. – गश्मीर महाजनी

  • 22/24

    पण माझ्याकडे जे आहे ते मी खूप मेहनत करून कमावलं आहे. आजही मी मेहनत करतो. – गश्मीर महाजनी

  • 23/24

    मी माझ्या कुटुंबाची काळजी घेत हे कमावलं आहे. – गश्मीर महाजनी

  • 24/24

    (रवींद्र महाजनींचे फोटो संग्रहित, तर गश्मीर महाजनीचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Gashmeer mahajani says bank wanted to seal his house after father ravindra mahajani debt hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.