-
महेश टिळेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.
-
त्यांच्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
-
सामाजिक किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर महेश टिळेकर परखडपणे आपलं मत मांडत असतात.
-
सध्या त्यांची “कृतज्ञ आणि कृतघ्न कलाकार” ही फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
-
काही वर्षांपूर्वी महेश टिळेकरांनी मराठी कलाविश्वातील काही निवडक तंत्रज्ञ आणि कलाकारांना मुंबईत माफक दरात सरकारी योजनेतून घरं मिळवून दिली होती.
-
परंतु, संबंधित मराठी कलाकारांना घरांचा ताबा मिळाल्यावर त्यांनी सरड्याप्रमाणे रंद बदलले. तसंच काही जणांनी चांगली किंमत आल्यावर ही घरं विकली. असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
-
महेश टिळेकर लिहितात, “असे कर्म दरिद्री कलाकार पाहिल्यावर आपल्या ह्याच मराठी कलाकारांसाठी आपण रक्त आटवून प्रयत्न केले याचा पश्चाताप नक्कीच झाला.”
-
पुढे या पोस्टमध्ये त्यांनी दोन मराठी कलाकारांबद्दलचे अनुभव त्यांचं नाव न घेता सांगितले आहेत.
-
त्यापैकी एका कलाकाराला महेश टिळेकरांनी गरजेला आर्थिक मदत केली होती. परंतु, संबंधित कलाकाराने त्यांचे पैसे वेळेत परत दिले नाहीत.
-
तसेच अभिनेत्रीबद्दलचा अनुभव सांगताना महेश टिळेकर म्हणाले, “पाच वर्षांनी त्या अभिनेत्रीने सरकारी योजनेतील तो फ्लॅट विकला तेव्हा चांगला व्ह्यू असल्यामुळे तिला त्या फ्लॅटचे अधिक पैसे मिळाले होते.”
-
महेश टिळेकर यांनी शेअर केलेल्या या संतप्त फेसबुक पोस्टची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.
-
फोटो सौजन्य : महेश टिळेकर फेसबुक
“असे कर्म दरिद्री कलाकार पाहिल्यावर…”, दिग्दर्शक महेश टिळेकरांची संतप्त पोस्ट, नेमकं काय घडलं?
दिग्दर्शक महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत…
Web Title: Director mahesh tilekar facebook post went viral on social media sva 00