• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress madhura velankar talks about father in law shivaji satam hrc

मधुरा वेलणकरने केलं सासरे शिवाजी साटम यांचं कौतुक; म्हणाली, “माझ्या लग्नानंतर…”

मधुरा वेलणकरने सासरे शिवाजी साटम यांच्याबद्दल केलेलं विधान चर्चेत

Updated: December 1, 2023 14:15 IST
Follow Us
  • Shivaji Satam Daughter In Law Actress Madhura Velankar
    1/12

    ‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारून अभिनेते शिवाजी साटम यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 2/12

    शिवाजी साटम यांना अभिजीत नावाचा मुलगा आहे, तो अभिनेता आहे. तर त्यांची सून मधुरा वेलणकर ही देखील अभिनेत्री आहे. 

  • 3/12

    अभिजीत व मधुरा यांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं. 

  • 4/12

    मधुरा वेलणकर व अभिजीत साटम यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना मधुरा म्हणाली, “माझ्या माहेरी आम्ही चौघी जणी आणि बाबा एकटे होते, सासरी आल्यावर हे तिघे जण आणि मी एकटी होते. या घरात बाई कोणीच नाही याचं मला दडपण होतं.”

  • 5/12

    ” पण जबाबदारीचं टेन्शन कधीच आलं नाही, कारण माझ्या सासऱ्यांचं घरात खूप लक्ष असतं. त्यांच्याकडून मी काही गोष्टी शिकले. पुरुष असून, ‘सीआयडी’चं शूटिंग चालू असूनही घरात काही संपलंय का? मुलं काय खातायत? ते बिलं भरणं या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष असायचं. त्यामुळे नकळत त्यांच्याकडून काही गोष्टी मी शिकले,” असं मधुरा म्हणाली.

  • 6/12

    “मी अभिनेत्री आहे आणि आधीच काम करतेय हे माहीत असल्यामुळे मी सकाळी उठून सात वाजता चहा करून द्यावा अशी अपेक्षा माझ्याकडून केली गेली नाही. मी रात्री उशीरा आले तर सकाळी १० पर्यंत झोपायचे,” असं मधुरा म्हणाले.

  • 7/12

     “माझे सासरे स्वतः चहा करून घ्यायचे, कामावर बाई आली तर काय करायचं हे तिला सांगायचे. त्यांनी मला मुलीसारखंच वागवलं, सूनेसारख्या अपेक्षा माझ्याकडून कधीच केल्या नाहीत,” असं मधुरा म्हणाली. 

  • 8/12

     सासरे अभिजीतला रोज फोन करत नाहीत, पण मला करतात असंही तिने सांगितलं.

  • 9/12

     “माझे सासरे सर्वांचेच लाड करतात. सध्या तरी आमच्या मुलाचे लाड जास्त होतात. माझं आणि सासऱ्यांचं माझ्या लग्नानंतर बाँडिंग झालं,” असं मधुराने सांगितलं.

  • 10/12

    “लग्नाआधी ते माझ्याशी फार बोलायचे नाहीत,” असं मधुरा म्हणाली.

  • 11/12

    “मला एक आवर्जून सांगावं वाटतं की मी येण्याआधीच घरात बाईला कोणत्या गोष्टी लागतील हे बदल त्यांनी करून घेतले होते. माझ्या लग्नानंतर एकत्र राहून हळूहळू आमचं बाँडिंग चांगलं झालं. मी माझ्या सासऱ्यांबरोबर दोन सिनेमे केलेत, ज्यात ते माझे वडील होते,” असं मधुरा म्हणाली.

  • 12/12

    (फोटो – मधुरा वेलणकर फेसबूक, शिवाजी साटम इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Actress madhura velankar talks about father in law shivaji satam hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.