-
गौहर खानने २८ मे २०२३ रोजी त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसत होती.
-
तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना गौहर म्हणाली होती, “तिने आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर १८ दिवसांत आधीच्या शेपमध्ये येण्याचा प्रयत्न केला आहे.
-
या अभिनेत्रीने १० दिवसांत १० किलो वजन कमी केले. मात्र, अशा प्रकारे प्रसूतीनंतर लगेचच वजन कमी करणे अत्यंत हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-
अनेक माता गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान त्यांच्या वजनाबद्दल चिंतेत असतात.
-
पण, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की गर्भधारणेनंतर लगेच वजन कमी करणे रिकव्हरीसाठी चांगले नाही.
-
प्रसूतीनंतर घाईघाईत खूप वजन कमी करणे अजिबात आरोग्यदायी नाही.
-
तज्ञांच्या मते, जर तुम्ही स्तनपान करत असाल तर बाळ २ महिन्यांचे होईपर्यंत वजन कमी करण्याचा विचार करू नका.
-
प्रसूतीनंतर महिलांनी ६ आठवडे विश्रांती घेऊन योग्य आहार घ्यायला हवा.
-
यानंतर आठवड्यातून दीड किलोपेक्षा जास्त वजन कमी करू नका. स्तनपान करणाऱ्या महिलांचे वजन नैसर्गिकरित्या हळूहळू कमी होऊ लागते.
-
डॉक्टरांच्या मते क्रॅश डाएट अजिबात करू नका.
-
प्रसूतीनंतर, महिलांना आणि त्यांच्या बाळाला अधिक पोषण आवश्यक असतं. त्यामुळे महिलांनी आहारात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवायला हवे.
-
तसेच संतुलित आहार घेऊन थोडे वजन कमी करता येऊ शकते. हलका व्यायाम करणे, चालणे या गोष्टी वजन घटवण्यास फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रसूतीच्या दोन आठवड्यांनंतरच चालायला सुरुवात करता येऊ शकते. (सर्व फोटो – गौहर खान इंस्टाग्राम)
गौहर खानने १० दिवसांत कमी केले १० किलो वजन, पण प्रसूतीनंतर लगेच वजन घटवणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञ म्हणतात…
गौहर खानने १० दिवसांत १० किलो वजन घटवलं, पण असं करणं किती योग्य? जाणून घ्या
Web Title: Gauhar khan lost weight journey post delivery experts suggest not to do that ieghd import hrc