-   बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने तीन लग्न केलीत आणि त्याला तीन अपत्ये आहेत. 
-  मोठी मुलगी त्रिशाला दत्त ही त्याची व पहिली पत्नी दिवंगत अभिनेत्री रिचा शर्मा यांची मुलगी आहे. 
-  फोटोमध्ये दिसणारी ही संजयची पहिली पत्नी रिचा शर्मा आहे. तिच्या कुशीत असलेली त्रिशाला आहे. 
-  संजयचे दुसरे लग्न रिया पिल्लईशी झाले होते. संजयला तिसरी पत्नी मान्यतापासून शाहरान नावाचा मुलगा व इकरा नावाची मुलगी आहे. 
-  संजय दत्त तिसरी पत्नी व मुलांसह भारतात राहतो. पण त्याची मोठी मुलगी परदेशात राहते. 
-  त्रिशाला दत्त न्यूयॉर्क शहरात राहते. 
-  ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. 
-  इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. 
-  त्रिशाला दत्त ३६ वर्षांची आहे. ती खूप ग्लॅमरस आहे. 
-  व्यवसायाने ती सायकोथेरपिस्ट आहे. 
-  त्रिशालाचं वडील संजय दत्तवर खूप प्रेम आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वडिलांबरोबरचे फोटो पाहायला मिळतात. 
-  संजय दत्तही लेकीबरोबरचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो. 
-  संजयने पत्नी व मुलांबरोबर नवीन वर्षाचंं स्वागत केलं. 
-  मान्यता दत्त आणि तिची सावत्र मुलगी त्रिशाला यांच्या वयात फक्त १० वर्षांचे अंतर आहे. त्रिशाला तिच्या आईपेक्षा १० वर्षांनी लहान आहे. 
-  मान्यताचा जन्म १९७८ मध्ये झाला होता, तर त्रिशालाचा जन्म १९८८ मध्ये झाला होता. 
-  त्रिशाला अमेरिकेत तिच्या आजी-आजोबांबरोबर राहते. ती तिथेच लहानाची मोठी झाली. 
-  ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते मात्र ती बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार नाही. त्रिशाला सायकोथेरपिस्ट असून अमेरिकेतच काम करते. 
-  त्रिशालाच्या लूकबद्दल बोलायचं झाल्यास ती बॉलीवूड अभिनेत्रींनाही लाजवेल इतकी सुंदर दिसते. 
-  ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 
-  त्रिशालाचा रणबीर कपूरबरोबरचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता. या फोटाची खूप चर्चा झाली होती. 
-  (सर्व फोटो – त्रिशाला दत्त व संजय दत्त इन्स्टाग्राम) 
संजय दत्तच्या मोठ्या मुलीला पाहिलंत का? करते ‘हे’ काम, सावत्र आईपेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे त्रिशाला
अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसते संजय दत्तची मुलगी, बाप-लेकीचं नातं कसं आहे? जाणून घ्या
Web Title: Sanjay dutt daughter trishala dutt is psychotherapist 10 years younger than her step mom manyata dutt see photos hrc