-
बालकलाकार मायरा वैकुळ ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
-
महाराष्ट्रात ती ‘परी’ या नावाने ओळखली जाते. मात्र आता ती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय झाली आहे.
-
‘निरजा’ या मालिकेतून तिने हिंदी मालिका विश्वात पदार्पण केलं होतं.
-
नुकतंच मायराने तिचा ७ वा वाढदिवस साजरा केला आहे. आज २२ जानेवारीला तिचा वाढदिवस आहे.
-
मायराने रात्री १२ वाजता तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिने दोन केक कापले आहेत.
-
मायराने आपल्या घरीच रात्री १२ वाजता केक कापले आहेत. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी घरातच सुंदर डेकोरेशन केलं होतं.
-
यावेळी डेकोरेशनसाठी युनिकॉर्न थीम ठेवली होती. मायरानेही या थीमला साजेसा ड्रेस घातला होता.
-
मायराच्या वाढदिवशी तिला शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक आले होते.
-
‘निरजा’ या मालिकेमध्ये मायराच्या आईची भुमिका साकारणारी स्नेहा वाघही यावेळी उपस्थित होती.
-
दरम्यान, चाहत्यांनीही मायराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो : मायरा/इन्स्टाग्राम अकाऊंट)
मायरा वैकुळच्या मिड-नाइट बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का? ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनेही लावली हजेरी
नुकतंच मायराने तिचा ७ वा वाढदिवस साजरा केला आहे. आज २२ जानेवारीला तिचा वाढदिवस आहे.
Web Title: Have you seen photos of myra vaikul mid night birthday celebration this famous actress also made an appearance to the party pvp