• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. jaya bachchan election affidavit amitabh bachchan property jewelry income source details hrc

महानायक अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती किती? जया बच्चन यांनी प्रतिज्ञापत्रात केला खुलासा

राजकारणी जया बच्चन यांनी अलीकडेच निवडणूक प्रतिज्ञापत्रात तिची आणि पती अमिताभ बच्चन यांची वैयक्तिक संपत्ती जाहीर केली आहे. काही महिन्यांपूर्वी मुलगी श्वेताला ५० कोटींचा बंगला गिफ्ट करणाऱ्या या जोडप्याची संपत्ती जाणून घेऊयात.

Updated: February 15, 2024 16:06 IST
Follow Us
  • Amitabh Bachchan jaya bachchan net worth celebrity update gujarati news
    1/10

    जया बच्चन एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत.

  • 2/10

    जया बच्चन यांनी अलीकडेच निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची आणि पती अमिताभ बच्चन यांची वैयक्तिक संपत्ती जाहीर केली आहे.

  • 3/10

    ‘बिझनेस टुडे’च्या अहवालानुसार, जया यांनी निवडणूक शपथपत्रात घोषित केलं की २०२२-२३ या आर्थिक वर्षात त्यांची वैयक्तिक संपत्ती १.६३ कोटी रुपये आहे.

  • 4/10

    प्रतिज्ञापत्रात अमिताभ बच्चन यांची यावर्षीची एकूण संपत्ती २७३.७४ कोटी रुपये होती. जया बच्चन यांचे बँक बॅलेन्स १०.११ कोटी रुपये आणि अमिताभ यांचे बँक बॅलेन्स १२०.४५ कोटी रुपये आहे. 

  • 5/10

    दोघांची एकत्रित जंगम मालमत्ता ८४९.११ कोटी रुपये असून स्थावर मालमत्ता ७२९.७७ कोटी रुपये आहे.

  • 6/10

    निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या एकत्रित मालमत्तेत विविध स्त्रोतांद्वारे मिळवलेल्या मालमत्तेचा समावेश आहे. जया यांच्या संपत्तीच्या स्त्रोतांमध्ये त्यांनी जाहिरातींद्वारे कमावलेले पैसे, खासदार म्हणून त्यांचा पगार आणि अभिनेत्री म्हणून त्यांचे मानधन यांचा समावेश आहे. 

  • 7/10

    अमिताभ यांच्या उत्पन्नाचे स्रोत अभिनेता म्हणून ते घेत असलेल्या मानधनाशिवाय व्याज, भाडे, डिव्हिडंट्स, भांडवली नफा आणि सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे मिळविलेला नफा यांचा समावेश आहे.

  • 8/10

    ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या आणखी एका रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की जया यांच्याकडे ४०.९७ कोटी रुपयांचे दागिने आणि ९.८२ लाख रुपयांची एक कार आहे. 

  • 9/10

    अमिताभ यांच्याकडे ५४.७७ कोटी रुपयांचे दागिने आणि १७.६६ कोटी रुपयांच्या १६ गाड्या आहेत, ज्यात दोन मर्सिडीज आणि एक रेंज रोव्हरचा समावेश आहे.

  • 10/10

    २०१८ मध्ये, जया बच्चन यांनी पती अमिताभ बच्चन यांच्यासह १००० कोटी रुपयांची त्यांची एकत्रित मालमत्ता असल्याचं जाहीर केलं होतं.

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanजया बच्चनJaya Bachchanफोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: Jaya bachchan election affidavit amitabh bachchan property jewelry income source details hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.