-
‘इश्कबाज’ फेम लोकप्रिय अभिनेत्री सुरभी चंदना लग्नबंधनात अडकली आहे.
-
सुरभीने नुकतीच तिचा बॉयफ्रेंड करण शर्माबरोबर लग्नगाठ बांधली.
-
सुरभीने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“शेवटी १३ वर्षांनी घरी…आम्ही एकत्र या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सोबत असू द्या” असं कॅप्शन सुरभीने लग्नाच्या फोटोंना दिलंय.
-
लग्नात सुरभीने पेस्टल रंगाचा कॉन्ट्रास लेहंगा परिधान केला होता.
-
तर करणनेही त्याच रंगाची शेरवानी आणि गोल्डन रंगाची पगडी घातली होती
-
दोघांनी लग्नासाठी एकाच रंगाचे कपडे निवडले होते.
-
सुरभी चंदनाच्या मंगळसुत्राच्या हटके डिझाइनने लक्ष वेधून घेतलं आहे.
-
सुरभीने जयपूरमध्ये करणशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला कुटुंबीय व जवळचे मित्र उपस्थित होते.
-
पाकिस्तानी गाणं ‘कहानी सुनो’ वर सुरभीने मंडपात एंट्री घेतली होती.
-
चाहते या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
-
सुरभीचा पती करण शर्मा हा बिझनेसमन आहे. तसेच तो ‘हेवन्स’ नावाची एनजीओही चालवतो. (फोटो – सुरभी चंदना इन्स्टाग्राम)
“१३ वर्षांनी घरी…!” प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमन बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, पाकिस्तानी गाण्यावरील एंट्रीने वेधलं लक्ष
राजस्थानमध्ये शाही सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी केलं लग्न, मंगळसूत्राच्या खास डिझाइनची चर्चा
Web Title: Surbhi chandna karan sharma royal wedding photos out hrc