-
नवीन बोलीभाषा वापरता येईल का? एक भूमिका दुसऱ्या भूमिकेपेक्षा वेगळी कशी वाटेल याचा शोध मी घेते आहे असं स्पृहा जोशीने म्हटलं आहे. तसंच आपली मतं स्पृहाने मांडली आहेत. (सर्व फोटो सौजन्य-स्पृहा जोशी, इंस्टाग्राम पेज)
-
आपल्या इंडस्ट्रीत खूप लवकर टाइपकास्ट केलं जातं. त्यामुळे मला उंच माझा झोका या मालिकेनंतर वाटलं होतं की ऐतिहासिक मालिकाच मिळतील पण सुदैवाने तसं झालं नाही असं स्पृहा जोशीने म्हटलं आहे.
-
जोशी आडनाव असल्याचा मला फार फायदा झालं असं मला मुळीच वाटत नाही. सुदैवाने असं काहीही झालं नाही. असं स्पृहा जोशीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.
-
एका पद्धतीची भूमिका एक व्यक्ती करते म्हणजे ती खऱ्या आयुष्यात तशीच असते असं नसतं असं मतही स्पृहाने मांडलं आहे. तसंच जोशी आडनाव असल्याचा फायदा झाला का? यावरही उत्तर दिलं आहे.
-
मी एकसारख्या भूमिका करत राहिले तर मलाही कंटाळा येईल आणि लोकांनाही ते पाहून कंटाळा येईल असं स्पृहा जोशीने आरपारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
-
स्पृहा जोशी असण्याची आडकाठी नक्कीच आली नाही, किंवा सुदैवाने तसा आरोप झाला नाही. अर्धे लोक एकमेकांना ओळखत असतात. असंही मत स्पृहाने मांडलं.
-
अभिनेत्री व्हायला घरातून सुरुवातीला थोडा विरोध झाला होता. पण एक दिवस मी निर्णय सांगितला. नंतर मात्र काही विरोध झाला नाही. घरुनही पाठिंबाच मिळाला.
-
स्पृहा जोशी असल्याने मला सगळं आरामात मिळालं, ठराविक आडनावाची आहे म्हणून काम मिळालं.. असा आरोप अजून तरी कुणी केलेला नाही. असंही मत स्पृहा जोशीने मांडलंं आहे.
-
काम करताना खूप चांगली माणसं मला भेटत गेली. जडणघडण होताना चांगली माणसं भेटणं याचा तुमच्या क्राफ्टवर परिणाम होतो असंही स्पृहाने म्हटलं आहे.
-
माणसं चांगली असली की ते तुमचे योग्यवेळी कानही पकडतात. यातून मी घडत गेले असं स्पृहाने म्हटलं आहे.
-
एखादी ग्रे शेड असलेली भूमिकाही मला करायची आहे त्यामध्ये आव्हानात्मक काहीतरी करायचं अजून बाकी आहे असंही स्पृहाने म्हटलं आहे.
-
एखादी मालिका सुरु असताना भान बाळगणं आवश्यक आहे. मात्र तो प्रोजेक्ट संपल्यावर स्पृहा म्हणून मलाही ओळख आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे असंही स्पृहाने म्हटलं आहे.
-
मराठी अभिनेत्रींनी जास्त ट्रोल केलं जातं. पण जे कलाकार आहेत ते माणूस म्हणून वेगळे असू शकतात हे स्वीकारलं जाणं आवश्यक आहे असं स्पृहाने म्हटलं आहे.
जोशी आडनावाचा फायदा झाला का? स्पृहा म्हणते…
स्पृहा जोशीने आत्तापर्यंत विविध मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Web Title: Did the joshi surname help spruha joshi gave this answer scj