-
भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.(फोटो – इन्स्टाग्राम)
-
ज्येष्ठ अभिनेते आणि कॉमेडियन जॉनी लीव्हर यांनी गोलमाल, जलवा, हिरो हिरालाल यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केलंय. ते भारतातील पहिले स्टँडअप कॉमेडियन मानले जाता. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती २४५ कोटी आहे.(फोटो – इन्स्टाग्राम)
-
कॉमेडियन, टीव्ही होस्ट भारती सिंग लोकप्रिय कॉमेडियन आहे. भारतीने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत परंतु कॉमेडी नाईट्स विथ कपिलमधील तिची लाली ही भूमिका खूप सर्वाधिक लोकप्रिय झाली. ती देशातील आघाडीची कॉमेडियन आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
अभिनेता आणि कॉमेडियन राजपाल यादव विनोदी व्यक्तिरेखांसाठी लोकप्रिय आहे. राजपालने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती ७० कोटी रुपये आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
द ग्रेट इंडियनमध्ये सुनील ग्रोव्हर आपल्या टॅलेंटने लोकांना हसवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील ग्रोव्हर प्रत्येक एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
कॉमेडियन कृष्णा अभिषेक एका एपिसोडसाठी १० लाख रुपये घेतो. तर किकू शारदा एका एपिसोडसाठी ७ लाख रुपये आणि राजीव ठाकूर ६ लाख रुपये घेतो. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
द ग्रेट इंडियन कपिल शोच्या एका एपिसोडसाठी अर्चना पूरण सिंह १० लाख रुपये घेते. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
भारतीय कॉमेडियन आणि अभिनेता अली असगरची एकूण संपत्ती ३४ कोटी रुपये आहे.(फोटो – इन्स्टाग्राम)
-
कपिल शर्मा हा भारतातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन आहे. २००७ मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज जिंकल्यानंतर कपिल शर्माने करिअरमध्ये मागे वळून पाहिलं नाही. (फोटो – इन्स्टाग्राम)
-
कपिल शर्मा आज इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत कॉमेडियनपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माची एकूण संपत्ती २८५ कोटी रुपये आहे. सध्या कपिल शर्मा नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शोमुळे खूप चर्चेत आहे. त्याच्या एका एपिसोडसाठी तो पाच कोटी रुपये घेत असल्याची बातमी समोर आली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
‘हे’ आहेत भारतातील आघाडीचे कॉमेडियन; एकाची संपत्ती २४५ कोटी, तर एकाचं मानधन पाच कोटी, वाचा यादी
टॉप कॉमेडन्स ऑफ इंडिया: गेल्या एका दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत विनोदी कलाकारांना खूप महत्त्व प्राप्त होत आहे. आज आम्ही अशाच काही विनोदी कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी लोकांना हसवले.
Web Title: Top comedians of india kapil sharma johnny lever sunil grover krushna abhishek fees per episode ieghd import hrc