-
२१ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांचा ‘कोई मिल गया’ चित्रपट खूप गाजला होता.
-
या चित्रपटात काही लहान मुलांच्या भूमिका होत्या. यामध्ये अनुज पंडित शर्मा याची खास भूमिका होती.
-
या चित्रपटात अनुज एका छोट्या सरदाराच्या म्हणजेच ‘बिट्टू सरदार’च्या भूमिकेत दिसला होता.
-
या चित्रपटातील त्यांचा ‘आयला’ हा डायलॉग खूप गाजला होता. पण ‘कोई मिल गया’चा ‘चुलबुला बिट्टू’ आता मोठा झाला आहे.
-
आता अनुज त्याच्या डॅशिंग बॉडीने आणि चांगल्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
अनुज सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्याचे अनेक फोटो फॅन्ससोबत शेअर करतो.
-
१९९१ मध्ये जन्मलेला अनुज पंडित शर्मा केवळ ११ वर्षांचा होता, तेव्हा त्याने कोई मिल गया या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटांव्यतिरिक्त त्याने टीव्हीवरही काम केले आहे.
-
अनुज ‘टोटल सियाप्पा’, ‘डरना मना है’ मध्ये काम केलं आहे. याशिवाय तो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या बामिनी आणि बॉईज या वेब सीरिजमध्ये दिसला होता.
-
चित्रपट आणि वेब सीरिज व्यतिरिक्त, तो ‘हीरो – भक्ती ही शक्ती है’, ‘हुकुम मेरे आका’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘परवरिश – सीझन २’, ‘बच्चों की अदालत’ आणि ‘आदत’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
‘कोई मिल गया’मधील ‘बिट्टू सरदार’ झालाय मोठा, तो आता काय करतो? कसा दिसतो? पाहा खास Photos
‘कोई मिल गया’ या चित्रपटात ‘बिट्टू सरदार’ची भूमिका साकारणारा अनुज पंडित शर्मा आता खूप बदलला आहे.
Web Title: Hrithik roshan preity zinta cute co star bittu sardar in koi mil gaya recents photos of anuj pandit sharma jshd import hrc