-
शहरांच्या नावावर चित्रपटांची नावं ठेवण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. वेब सीरिज आल्यानंतर हा ट्रेंड आणखी वाढला आहे. चित्रपट निर्मात्यांनी उत्तर प्रदेशातील शहरांच्या नावावर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज आणल्या आहेत. या चित्रपटांबद्दल आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊया.
-
अलीगढ
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अलीगढ या चित्रपटाचे नाव उत्तर प्रदेशातील शहरावर ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात एका प्रोफेसरच्या वैयक्तिक आयुष्याची रंजक गोष्ट दाखवण्यात आली आहे. -
बनारस- अ मिस्टिक लव्ह स्टोरी
जातीवादाच्या जाळ्यात अडकलेल्या प्रेमकथेवर आधारित ‘बनारस- अ मिस्टिक लव्ह स्टोरी’ हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. बनारसची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. -
मिर्झापूर
‘मिर्झापूर’ वेब सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन रिलीज झाले आहेत. आता प्रेक्षक त्याच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही एक धमाकेदार वेब सीरिज आहे जी उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शहराच्या नावावर बनवण्यात आली आहे. -
बरेली की बर्फी
‘बरेली की बर्फी’ चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे हा उत्तर प्रदेशातील शहराच्या नावावर बनलेला एक लोकप्रिय चित्रपट आहे. -
लखनौ सेंट्रल
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या नावावर असलेल्या ‘लखनऊ सेंट्रल’ या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. पण यातील गाणी खूप लोकप्रिय आहेत. हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. -
जिला गाझियाबाद
दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरावर बनलेला ‘जिला गाझियाबाद’ हा चित्रपट खऱ्या कथेवर आधारित आहे. -
आझमगड
‘आझमगड’ चित्रपटाची कथा दहशतवादाच्या अवतीभोवती फिरते. पंकज त्रिपाठी, अमिता वालिया आणि अनुज शर्मा सारखे उत्कृष्ट कलाकार या चित्रपटात आहेत.
(सर्व फोटो- चित्रपटाचे पोस्टर्स, PR व इन्स्टाग्राम)
Photos : यूपीतील जिल्ह्यांच्या नावावर बेतलेले बॉलीवूड चित्रपट अन् वेब सीरिज, हटके कथांमुळे राहिले चर्चेत, वाचा यादी
चित्रपट निर्मात्यांनी उत्तर प्रदेशातील शहरांच्या नावावर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज आणल्या आहेत. आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि वेब सीरिज उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये शूट करण्यात आल्या आहेत.
Web Title: Movies name on districts of uttar pradesh bollywood films series list jshd import hrc