-
प्रतीक बब्बरने नुकतीच Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली.
-
या कार्यक्रमात त्यांची दिवंगत आई आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांचा ‘मंथन’ हा चित्रपट दाखवण्यात आला .
-
या सोहळ्यात प्रतीक बब्बर पँट सूट घालून दिसला होता.
-
आता अभिनेत्याच्या या सूटबद्दल एक खास अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे चाहते खूप खूश आहेत.
-
प्रतीक बब्बर त्याची दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या साडीपासून बनवलेला सूट परिधान करून कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला.
-
प्रतीकचा हा सूट स्मिता पाटील यांच्या कांजीवराम साडीपासून बनवला होता.
-
याचा खुलासा प्रतीकचा डिझायनर राहुल विजयने केला आहे.
-
अभिनेत्याचे फोटो शेअर करत राहुलने कॅप्शनमध्ये लिहिलं, “प्रतीक मला तुझी दिवंगत आई आणि अत्यंत आदरणीय स्मिता पाटील यांच्या जपून ठेवलेल्या गोष्टी वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.”
-
जेव्हा प्रतीकने मला फोन केला आणि मला स्मिता पाटील यांच्या ‘मंथन’ चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी ड्रेस तयार करण्यास सांगितलं, तेव्हा मला वाटलं की त्याच्या लूकमध्ये स्मिता पाटील यांची आठवण असायला हवी. – राहुल विजय
-
आता हे आव्हानात्मक होतं, कारण त्यांच्या कपाटातून आम्हाला फक्त महिलांचे कपडे सापडत होते आणि त्याशिवाय स्मिता पाटील यांच्या वॉर्डरोबमधून आम्हाला काय मिळेल हे माहीत नव्हतं.- राहुल विजय
-
मग आम्हाला त्यांच्या आठ साड्या मिळाल्या. – राहुल विजय
-
आम्ही त्यातील दोन सुंदर सिल्क कांजीवराम साड्यांवर लक्ष केंद्रित केलं. एक गडद मरून व काळ्या रंगाची व दुसरी साधी काळी सिल्क साडी होती.- राहुल विजय
-
या सांभाळून जपून ठेवलेल्या साड्या होत्या. – राहुल विजय
-
त्यानंतर मी प्रतीकच्या स्टाइलला सूट होणारा व स्मिताजींच्या साडींना न्याय देणारा ड्रेस डिझाइन केला, हे खूप आव्हानात्मक होतं, असं राहुल विजय म्हणाला.
-
(सर्व फोटो – राहुल विजय इन्स्टाग्राम)
स्मिता पाटील यांच्या कांजीवरम साड्यांपासून बनवलेला सूट घालून लेक प्रतीक पोहोचला Cannes मध्ये, पाहा खास Photos
दिवंगत स्मिता पाटील यांच्या ‘मंथन’ चित्रपटाचं स्क्रीनिंग कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आलं होतं.
Web Title: Prateik babbar cannes 2024 suit was made from his late mother smita patil kanjeevaram sarees see photos hrc