-
‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा तिसरा सीझन OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. ( फोटो – स्क्रीनशॉट)
-
या मालिकेतील कालीन भैया आणि गुड्डू पंडित यांच्याशिवाय कवी रहीमचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. ( फोटो – स्क्रीनशॉट)
-
‘मिर्झापूर ३’ मध्ये रहीम नावाचे हे पात्र एक कवी आहे जो आपल्या कवितांमुळे अडचणीत सापडतो.
-
या मालिकेत रहीमने नेताजींना शिवीगाळ असलेली कविता ऐकवली आणि लोकांचे मनोरंजन केले.
-
ही व्यक्तिरेखा मालिकेच्या फक्त तीन भागांमध्ये दिसत असली तरी, त्यामुळे प्रेक्षकांचं खूप मनोरंजन झालं आहे.
-
आपल्याला हसवण्यासोबतच मिर्झापूरची कथा बदलण्यातही या पात्राचा मोठा वाटा आहे.
-
अशा परिस्थितीत कवी रहीमची भूमिका साकारणारा हा अभिनेता कोण आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.
-
कवी रहीमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव पल्लव सिंह आहे.
-
या सीरिजमध्ये त्याने उत्कृष्ट अभिनय केला असून, त्याचे खूप कौतुकही होत आहे.
-
पल्लवने ‘मिर्झापूर ३’ पूर्वीही अनेक सीरिजमध्ये काम केलं आहे. सीरिजमधील त्याचा स्क्रीन टाईम फार मोठा नसला तरी तो जोरदार आहे.
-
‘मिर्झापूर ३’पूर्वी त्याने ‘माई’ आणि ‘ताज: डिवाइडेड बाय ब्लड’मध्ये काम केले होते.
-
पल्लव हा थिएटर आर्टिस्ट आहे.
-
त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, त्याने सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आणि नंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले.
-
पल्लव सिंहने अनेक नाटकंही लिहिली आहेत.
-
(सर्व फोटो – पल्लव सिंह इन्स्टाग्राम)
‘मिर्झापूर ३’ मध्ये नेताजींवर कविता करून लोकांची मने जिंकणारा ‘हा’ अभिनेता कोण आहे? जाणून घ्या
‘मिर्झापूर ३’ या सीरिजमधील एका नवीन पात्राने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे, जो आपल्या कविता आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
Web Title: Mirzapur 3 who is the actor played kavi raheem in series know about pallav singh hrc