-
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानींचा लाडका मुलगा अनंत अंबानी आज लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे या शाही लग्नासाठी वेगवेगळ्या देशाचे पंतप्रधान, हॉलीवूड, बॉलीवूडचे सेलिब्रिटी, राजकीय नेतेमंडळी मुंबईत दाखल झाले आहेत. अंबानींकडून या पाहुणे मंडळींचं खास स्वागत केलं जात आहे.
-
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी जगप्रसिद्ध सेलिब्रिटी किम कार्दशियन काल (११ जुलै) रात्री बहीण क्लोई कार्दशियनबरोबर मुंबईत दाखल झाली. अंबानींकडून तिचं पारंपरिक पद्धतीने भव्य असं स्वागत करण्यात आलं.
-
किम कार्दशियन व क्लोई कार्दशियनने आपल्या इन्स्टाग्रामवर अंबानींकडून करण्यात आलेल्या स्वागताचे फोटो शेअर केले आहेत.
-
अनंत-राधिकाच्या लग्नानिमित्ताने पहिल्यांदा किम आपल्या बहिणीबरोबर भारतात आली आहे. यावेळी दोघींचं स्वागत भारतीय पद्धतीने केलं गेलं. कपाळी टिळा लावून औक्षण करून दोघींचं स्वागत केलं.
-
तसंच हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर किम व क्लोईला बासरीच्या सुरात रुमपर्यंत पोहोचवण्यात आलं.
-
किम आणि क्लोई कार्दशियनच्या भारतातील स्वागताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
किमने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये पितळेचं एक ताट दिसत आहे. त्या ताटात मोगरा आणि भारतीय मसाले पाहायला मिळत आहेत.
-
किम आणि क्लोई कार्दशियन शिवाय ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, टोनी ब्लेअर, जेफ कून्स, जे शेट्टी, जॉन सीना असे अनेक जण परदेशातून मुंबईत खास अनंत-राधिकाच्या पोहोचले आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – किम, क्लोई कार्दशियन आणि सोशल मीडिया
Photos: मोगरा, भारतीय मसाले अन्…; अनंत अंबानींच्या लग्नासाठी मुंबईत आलेल्या किम कार्दशियनचं ‘असं’ झालं स्वागत
Anant Ambani and Radhika Merchant Wedding: जगप्रसिद्ध सेलिब्रिटी किम कार्दशियन व तिच्या बहीणचं पारंपरिक पद्धतीनं केलं स्वागत, पाहा फोटो
Web Title: Anant ambani and radhika merchant wedding kim kardashian khloe kardashian receive a desi welcome photos viral pps