-
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत बरेच काम केले. त्यांनी टीव्हीपासून चित्रपटांपर्यंत सर्वच ठिकाणी. वेगवेगळ्या पात्रांमध्ये काम केले आहे. पण वैयक्तिक आयुष्यामुळे ते कधीच प्रकाशझोतात आले नाही. त्याच्या पत्नी आणि मुलांबद्दल कधीही काहीही माहिती मिळाली नाही. कारण त्यांनी कधीच लग्न केले नाही. पण या मागचे नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊ.
-
‘शक्तिमान’ आणि ‘भीष्म पितामह’ या सारख्या अजरामर भूमिका साकारून देशात आणि जगाभरात प्रसिद्ध झालेले मुकेश खन्ना पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय शोसह कमबॅक करत आहेत. ते नव्या पिढीसाठी ‘शक्तिमान टीचर’ घेऊन येत आहेत. हे नवे एपिसोड कदाचित येत्या काही वर्षात टीव्हीवरही पाहायला मिळतील. दरम्यान, अनेकदा वादात अडकलेल्या या अभिनेत्याचे नाव कधीही कोणत्याही मुलीशी किंवा अभिनेत्रीशी जोडले गेले नाही. जेव्हा ते त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, जेव्हा त्यांच्याकडे नाव आणि प्रसिद्धी होती तरीही अफेअरच्या चर्चा ऐकायला मिळाल्या नाहीत. आजही मुकेश खन्ना अविवाहित आहेत.
-
मुकेश खन्ना यांचा जन्म २३ जून १९५८ रोजी झाला. २०२४ मध्ये ते ६६ वर्षांचे आणि अविवाहित आहेत. म्हणजेच ते विवाहित नाहीत आणि त्यांना पत्नी आणि मुलेही नाहीत.
-
गीता विश्वासची भूमिका साकारणाऱ्या वैष्णवी महंत या अभिनेत्रीने सांगितले होते की, शूटींगदरम्यान मुकेश खन्ना यांनी तिला कधी मिठी मारली नाही किंवा तिला गरजेचं नसताना स्पर्श करु दिला नाही. त्यांनी हे मुलींचा आदर म्हणून केले. तसेच महिलांपासून १० पावले दूर असायचे असंही अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं होतं.
-
मुकेश खन्ना यांनी लग्न केले नाही. यामागे एक अफवा अशीही आहे की त्यांनी भीष्म पितामहाची भूमिका केली होती. म्हणूनच कदाचित त्यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली आणि नेहमी ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली.
-
पण मुकेश खन्ना यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत या अटकळांना पूर्णविराम दिला होता. अशी कोणतीही शपथ घेतली नसल्याचे त्यानी सांगितले होते..
-
‘ऑन द टॉक्स’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी लग्न न करण्यामागची कारणे सांगताना सांगितले की, ‘मी लग्न प्रक्रियेच्या विरोधात नाही. लोक अनेकदा म्हणतात की मुकेश खन्नाने भीष्म पितामह यांची भूमिका साकारली होती, जी त्यांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही पाळली. म्हणूनच मी लग्न केले नाही.
-
‘मी तुम्हाला सांगतो की मी इतका महान नाही आणि कोणीही भीष्म पितामह होऊ शकत नाही. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात भीष्मांसारखी कोणतीही प्रतिज्ञा घेतलेली नाही. तसेच मी तुम्हाला सांगतो की लग्न संस्थेच्या परंपरेवर माझ्याएवढा जास्त कोणाचाही विश्वास नसेल.
-
मुकेश खन्ना पुढे म्हणाले, ‘मला लग्न करावे लागले तर ते कधीही होईल. आता माझ्यासाठी मुलगी जन्माला येणार नाही. लग्न ही माझी वैयक्तिक बाब आहे. मला पत्नी नाही. मी लग्नाच्या विरोधात नाही. लग्न हे नशिबात लिहिलेले असते. माझे अफेअरही नाही. मी हा वाद कायमचा संपवतो. ज्यांच्या नशिबी लग्न ठरते तेच लग्न करतात. मात्र, माझ्या बोलण्याच्या सवयीमुळे अनेक वादग्रस्त गोष्टी माझ्याशी जोडल्या गेल्या आहेत.
-
(Photos Source : Mukesh Khanna Instagram/ Social Media/ ANI)
हेहा पाहा- ‘शक्तिमान’ परत आला, ट्रोलही झाला; मुकेश खन्ना यांच्याबरोबर नेमकं घडलं काय?, चित्रपटात कोण साकारणार सुपरहिरोची भूमिका, म्हणाले…
६६ व्या वर्षीही ‘शक्तिमान’ अविवाहित का?; लग्न न करण्यामागचं कारण काय?, स्वतः मुकेश खन्नांनी दिलेलं स्पष्टीकरण
why shaktimaan mukesh khanna is still unmarried : अभिनेत्याचे नाव कधीही कोणत्याही मुलीशी किंवा अभिनेत्रीशी जोडले गेले नाही. जेव्हा ते त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते, जेव्हा त्यांच्याकडे नाव आणि प्रसिद्धी होती तरीही अफेअरच्या चर्चा ऐकायला मिळाल्या नाहीत. आजही मुकेश खन्ना अविवाहित आहेत.
Web Title: Why shaktimaan mukesh khanna is still unmarried his statement about wife and marriage culture spl