-
प्रसिद्ध अभिनेत्री आणि युट्यूबर तितिक्षा तावडेने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या झी मराठीवरील मालिकेमधून तितिक्षा अत्यंत लोकप्रिय झाली.
-
अभिनयासह तितिक्षाने सोशल मीडियावरही सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला.
-
त्यासाठी तितिक्षाने नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वतःचा युट्युब चॅनेल सुरु केला.
-
एक वर्ष पूर्ण होताच तितिक्षाला युट्यूबकडून एक बक्षीस मिळालं आहे.
-
तितिक्षाचे युट्युबवर १ लाख सदस्य पूर्ण झाल्यामुळे युट्यूब सिल्वर प्ले बटण मिळाले आहे.
-
तितिक्षाने तिला मिळालेल्या या सिल्वर प्ले बटण घेऊन फोटो काढले आहे.
-
या यशाच्या शिखरावर पोहचायला तिला तिच्या नवऱ्याने व बहिणीने सपोर्ट केल्याचे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
-
तसेच युट्युब चॅनल सुरु करण्यासाठी तितिक्षाला तिची बहीण खुशबू तावडेने आग्रह केला होता, असेही तिने सांगितले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य ; तितिक्षा तावडे / इंस्टाग्राम )
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितिक्षा तावडेची स्वप्नपूर्ती
नवरा आणि बहिणीला संपूर्ण क्रेडिट देत सोशल मीडियावर केली खास पोस्ट
Web Title: Satvya mulichi satvi mulgi fame titeeksha tawade achieves silver play button shares photos on social media pyd 04