• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. late tabla maestro zakir hussain full name what his wife and daughters do know details hrc

झाकीर हुसैन यांचे पूर्ण नाव काय होते, त्यांची पत्नी आणि मुली काय करतात? जाणून घ्या

Zakir Hussain Family : झाकीर हुसैन यांच्या कुटुंबात कोण कोण आहेत आणि त्यांची पत्नी काय करते?

Updated: December 16, 2024 14:45 IST
Follow Us
  • Zakir Hussain Movies
    1/9

    Zakir Hussain Family तबला जादूगार उस्ताद झाकीर हुसेन यांनी ७३ व्या वर्षी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

  • 2/9

    ते दीर्घकाळापासून हृदयविकाराने त्रस्त होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/9

    झाकीर हुसेन यांचे पूर्ण नाव झाकीर हुसेन अल्लारखा कुरेशी होते. त्यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल हायस्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/9

    उस्ताद झाकीर हुसेन हे प्रसिद्ध तबलावादक अल्ला रखा यांचे पुत्र होते. अल्ला रखा यांनी दोन लग्नं केली होती. त्यांना झाकीर हुसेन, फजल कुरेशी आणि तौफिक कुरेशी हे तीन मुलगे आणि त्यांची पहिली पत्नी बनी बेगम हिच्यापासून खुर्शीद औलिया कुरेशी आणि रझिया या दोन मुली होत्या. दुसरी पत्नी जीतन बेगम होती, तिला एक मुलगी रुही बानो आणि एक मुलगा साबीर होता. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    रुही बानो 1980 च्या दशकातील पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिने दोन लग्नं केली पण दोन्ही टिकू शकली नाही. त्याला एक मुलगा देखील होता ज्याची 20 व्या वर्षी लाहोरमध्ये हत्या झाली होती. (फोटो: झाकीर हुसेन/इन्स्टा)

  • 6/9

    मुलाच्या हत्येनंतर रुही बानोने अभिनय सोडून दिला होता. या घटनेतून ती पूर्णपणे सावरली नाही आणि 2019 मध्ये तिने या जगाचा निरोप घेतला. (फोटो: झाकीर हुसेन/इन्स्टा)

  • 7/9

    झाकीर हुसैन यांनी 1978 मध्ये कथ्थक नृत्यांगना आणि शिक्षिका अँटोनिया मिनेकोला यांच्याशी विवाह केला. अँटोनिया मिनेकोलाही त्यांची मॅनेजर होती. अँटोनिया कॅलिफोर्नियामध्ये झाकीर हुसेनला भेटली जिथे ती नृत्याचे धडे घेत असे. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. (फोटो: झाकीर हुसेन/इन्स्टा)

  • 8/9

    झाकीर हुसेन आणि अँटोनिया मिनेकोला यांना दोन मुली आहेत. अनिसा कुरेशी ही मोठी मुलगी आणि इसाबेला कुरेशी ही धाकटी मुलगी. (फोटो: झाकीर हुसेन/इन्स्टा)

  • 9/9

    झाकीर हुसैन यांची मोठी मुलगी अनीसा कुरेशी ही चित्रपट निर्माती आहे. तर त्यांची धाकटी मुलगी इसाबेला कुरेशी न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentसंगीतMusicसंगीतकारMusician

Web Title: Late tabla maestro zakir hussain full name what his wife and daughters do know details hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.