-
रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित ‘टाइमपास’ (Timepass Movie) चित्रपटाला आज (०३ जानेवारी २०२५) ११ वर्ष पूर्ण झाली.
-
‘टाईमपास’ म्हणून सुरु झालेली ‘दगडू’ (Dagdu) आणि ‘प्राजक्ता’ची (Prajakta) हळुवार प्रेमकथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
-
अभिनेता प्रथमेश परबने (Prathamesh Parab) या चित्रपटात ‘दगडू’ची भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटात ‘प्राजक्ता’ची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगांवकरने (Ketaki Mategaonkar) साकारली होती.
-
प्रथमेशने सोशल मीडियावर ‘टाइमपास’ चित्रपटातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना प्रथमेशने “ए, तो बघ दगडू!.. दगडू, एक सेल्फी काढू का? दगडू, आता नवीन कोणता सिनेमा येतोय? आज ११ वर्षानंतरही, दगडू लोकांच्या लक्षात आहे, या प्रेमाबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे. माझं आयुष्य ३६०° ने बदलणारी एक संधी, एक व्यक्तिरेखा आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचा झालेला अविभाज्य भाग! एखादा सिनेमा हिट झाला तरीही हा दगडू मला आठवतो किंवा एखादा सिनेमा फारसा चालला नाही तरीही! सिनेमा हिट झाल्यावर, Timepass च्या वेळचे हाऊसफुलचे बोर्ड आठवतात, आई बाबा आणि साईबाबा शप्पथ असच काम करत रहा, अस म्हणत दगडू माझं कौतुक करत असेल हे जाणवत. त्याउलट जर एखादा सिनेमा फारसा चालला नाही तर, तू टेन्शन नको घेऊस रे, टेन्शनला, चल ए, हवा आने दे म्हण आणि पुढे जा, असही म्हणणारा दगडू मला जाणवतो…” असे कॅप्शन दिले आहे.
-
‘टाइमपास’ चित्रपटात शेवटी होणारी ‘दगडू’ आणि ‘प्राजक्ता’ची ताटातूट पाहून अनेक प्रेक्षक हळहळले होते.
-
रवी जाधव यांची कथा-पटकथा-संवाद असलेल्या या म्युझिकल लव्हस्टोरीमधील प्रेमाचा मूड जपणारी गाणी चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केली होती.
-
नितीन केणी, निखिल साने आणि मेघना जाधव या चित्रपटाचे निर्माते होते.
-
‘टाइमपास’ चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचे आणखी दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रथमेश परब/इन्स्टाग्राम)
‘टाइमपास’ चित्रपटाला ११ वर्ष पूर्ण; दगडू फेम अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…
‘टाईमपास’ म्हणून सुरु झालेली ‘दगडू’ आणि ‘प्राजक्ता’ची हळुवार प्रेमकथा या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
Web Title: Timepass marathi movie completed 11 years dagdu fame actor prathamesh parab shared bts photos sdn