-
कपिल शर्मा आज त्याच्या कॉमेडीमुळे घराघरात प्रसिद्ध आहे. तो त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ या शोसाठी ओळखला जातो, ज्याला टीव्हीवर खूप लोकप्रियता मिळाली आहे. (Photo: Social Media)
-
सध्या तो नेटफ्लिक्ससोबत ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या नवीन सेलिब्रिटी टॉक शोमध्ये काम करत आहे. २०२४ मध्ये, त्याची गणना भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत झाली. त्याने २६ कोटी रुपये कर भरला होता. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे ३०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. (Photo: Social Media)
-
टीव्ही अभिनेता करण कुंद्रा हा त्याच्या आकर्षक लूक आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्याने ‘कितनी मोहब्बत है’ आणि ‘दिल ही तो है’ सारखे लोकप्रिय शो केले आहेत. मनी मिंट वेबसाइटनुसार करण कुंद्राची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये आहे. (Photo: Social Media)
-
या यादीतील तिसरे नाव हर्षद चोप्राचे आहे, जो बेपनाह, किस देश में है मेरा दिल सारख्या शोसाठी प्रसिद्ध आहे. त्याने बेपनाहच्या एका एपिसोडसाठी ३ लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारल्याचे वृत्त आहे. या शोमध्ये त्याची आणि जेनिफर विंगेटची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे ४९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. (Photo: Social Media)
-
जेनिफर विंगेट ही सर्वात लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही ती प्रेक्षकांमध्ये ‘दिल मिल गये’ मधील डॉ. रिद्धिमा म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या ती रायसिंगानी विरुद्ध रायसिंगानी या चित्रपटात अनुष्काच्या भूमिकेत दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, ती ४५ ते ५८ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. (Photo: Social Media)
-
बिग बॉसची विजेता तेजस्वी प्रकाश ही बऱ्याच काळापासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील महत्वाची अभिनेत्री मानली जाते. (Photo: Social Media)
-
रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे २५ कोटी रुपये आहे. (Photo: Social Media)
-
लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली रुपाली गांगुली प्रत्येक एपिसोडसाठी ३ लाख रुपये घेते. (Photo: Social Media)
-
जीक्यू इंडियाच्या मते, तिची अंदाजे एकूण संपत्ती २०-२५ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. (Photo: Social Media)
कपिल शर्मापासून ते तेजस्वी प्रकाशपर्यंत, छोट्या पडद्यावरील ‘हे’ कलाकार सर्वाधिक संपत्तीचे मालक; जाणून घ्या मालमत्तेबद्दल…
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे सर्वात श्रीमंत आहेत आणि त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे.
Web Title: Kapil sharma rupali ganguly jennifer winget karan kundra harshad chopda tejasswi prakash 6 richest tv actors and their net worth spl