• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. top 10 most popular web series of all time breaking bad to the family man spl

ब्रेकिंग बॅड ते द फॅमिली मॅनपर्यंत; IMDb वरील आतापर्यंतच्या टॉप १० सर्वात लोकप्रिय वेब सिरीज…

आयएमडीबीने आतापर्यंतच्या टॉप १० सर्वात लोकप्रिय वेब सिरीजची यादी शेअर केली आहे.

Updated: February 16, 2025 16:56 IST
Follow Us
  • Top 10 Most Popular Web Series of all Time Breaking Bad to The Family Man
    1/11

    गेल्या काही वर्षांत, मनोरंजनाच्या जगात वेब सिरीजनी स्वतःचे एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आणि विविध ऑनलाइन लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर इतके कार्यक्रम प्रसारित होत असल्याने, अनेकदा काय पहावे आणि कोणते सर्वोत्तम आहेत याबद्दल गोंधळ होतो. IMDB ने चाहत्यांच्या मतांवर आधारित सर्वोत्तम वेब सिरीज मानल्या जाणाऱ्या शोची यादी शेअर केली आहे.

  • 2/11


    ब्रेकिंग बॅड (नेटफ्लिक्स)
    ब्रेकिंग बॅड ही एक अमेरिकन क्राइम ड्रामा टेलिव्हिजन मालिका आहे. ब्रेकिंग बॅडला त्याच्या अभिनय, दिग्दर्शन, छायांकन, लेखन, कथा आणि व्यक्तिरेखांसाठी खूप प्रेम मिळते. हा शो एका रसायनशास्त्राच्या शिक्षकाबद्दल आहे ज्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे जो त्याच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी एका माजी विद्यार्थ्यासोबत मेथॅम्फेटामाइनचे (ड्रग) उत्पादन आणि विक्री करतो.

  • 3/11


    गेम ऑफ थ्रोन्स (प्राइम व्हिडिओ)
    गेम ऑफ थ्रोन्स ही निश्चितच आतापर्यंतच्या बहुचर्चित मालिकांपैकी एक आहे या सिरीजमधील उत्तम अभिनय, गुंतागुंतीचे पात्र, कथानक आणि निर्मिती मूल्यांचे नेहमी कौतुक केले जाते. नग्नता आणि हिंसक दृष्यांमुळेही GOT ची खूप चर्चा होते.

  • 4/11


    मिर्झापूर (प्राइम व्हिडिओ)
    मिर्झापूर ही पूर्णपणे काल्पनिक सिरीज असून, तिचे कथानक आकर्षक आहे. रक्तरंजित आणि विनोदांचे मिश्रण तसेच मजबूत कलाकार हे सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरले आहेत. या ,सिरीजचे तीन सीझन आले आहेत.

  • 5/11


    द बॉईज (प्राइम व्हिडिओ)
    द बॉईज ही एक अमेरिकन सुपरहिरो ड्रामा मालिका आहे जी त्यांच्या सुपरपॉवरचा गैरवापर करणाऱ्या भ्रष्ट सुपरहिरोंना मारण्यासाठी निघालेल्या जागरुकांच्या गटाबद्दल आहे. ही मालिका गार्थ एनिस आणि डॅरिक रॉबर्टसन यांच्या द बॉईज कॉमिक बुकवर आधारित आहे.

  • 6/11


    डेअरडेव्हिल (नेटफ्लिक्स)
    डेअरडेव्हिलच्या भूमिकेत मॅट मर्डॉक दिवसा एका अंध वकिलाची भूमिका करतो, तर रात्री न्यू यॉर्कमध्ये गुन्हेगारीशी लढणाऱ्या चौकीदाराची भूमिका करतो. शोची उच्च निर्मिती गुणवत्ता आणि नाट्यमयता प्रेक्षकांना एक रोमांचक अॅक्शनचा अनुभव देतो.

  • 7/11


    द वॉकिंग डेड (नेटफ्लिक्स)
    द वॉकिंग डेड, ही एक अमेरिकन पोस्ट-अपोकॅलिप्टिक हॉरर ड्रामा टेलिव्हिजन मालिका आहे, ज्यामध्ये झोम्बी एपोकॅलिप्समधून वाचलेल्या कलाकारांची मोठी टीम दाखवली आहे. शेरीफ डेप्युटी रिक ग्रिम्स कोमातून जागा होतो आणि त्याला कळते की जग उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी वाचलेल्यांच्या समुहाचे नेतृत्व करावे लागेल.

  • 8/11


    सेक्रेड गेम्स (नेटफ्लिक्स)
    ही मालिका सरताज सिंग (सैफ अली खान) ची कथा सांगते, जो मुंबईतील एक त्रासलेला पोलीस अधिकारी आहे. त्याला गँगस्टर गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) फोन करून २५ दिवसांत शहर उद्ध्वस्त करण्याचा इशारा देतो. ही मालिका २० हून अधिक भाषांमध्ये पाहता येते. तिला सर्व भाषांमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

  • 9/11


    अफसोस (प्राइम व्हिडिओ)
    ‘अफसोस’ची कथा नकुल या पात्राभोवती फिरते
    ज्याच्या आयुष्यात काहीच बरोबर नाही. नकुलने ११ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

  • 10/11


    ब्रीद (प्राइम व्हिडिओ)
    या भारतीय गुन्हेगारी थ्रिलर चित्रपटात आर. माधवन, अमित साध, हृषिकेश जोशी, सपना पब्बी, अथर्व विश्वकर्मा आणि नीना कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. अभिषेक बच्चन अभिनीत या मालिकेचा पुढचा भाग ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ आहे. ही मालिका आपल्या प्रियजनांचे रक्षण करण्यावर बेतलेली आहे.

  • 11/11


    द फॅमिली मॅन (प्राइम व्हिडिओ)
    द फॅमिली मॅन ही एक स्पाय ॲक्शन थ्रिलर सिरीज आहे, ज्यामध्ये मनोज बाजपेयी श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत आहे, एक मध्यमवर्गीय माणूस गुप्तपणे गुप्तचर अधिकारी म्हणून काम करतो. या मालिकेत प्रियामणी, शरद केळकर, नीरज माधव, शारिब हाश्मी, दलीप ताहिल, सनी हिंदुजा आणि श्रेया धन्वंतरी यांच्याही भूमिका आहेत. हेही पाहा- ‘या’ ११ कोरियन वेब सिरीजमध्ये भारताची झलक, जिंकली प्रेक्षकांची मनं…

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Top 10 most popular web series of all time breaking bad to the family man spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.