Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from satya to sarkar 7 films that brought success to ram gopal varma spl

सत्या ते सरकार; दिग्दर्शक राम गोपाल वर्माला ‘या’ ७ चित्रपटांनी दिलं घवघवीत यश, आजही हे सिनेमे चर्चेत असतात…

Ram Gopal Varma Blockbuster movies on OTT: हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी एकापेतक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या ब्लॉकबस्टर आणि कल्ट चित्रपटांची यादी पहा.

April 7, 2025 12:17 IST
Follow Us
  • Ram Gopal Varma Movies
    1/9

    हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक राम गोपाल वर्मा आज त्यांचा ६३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. (Photo: Indian Express)

  • 2/9

    राम गोपाल वर्मा हे चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या शैलींचे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. चला त्यांच्या त्या चित्रपटांवर एक नजर टाकूया ज्यांनी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे…(Photo: Indian Express)

  • 3/9

    शिव
    राम गोपाल वर्मा यांनी ‘शिवा’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश केला. हा तेलुगू चित्रपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला. पुढच्याच वर्षी १९९० मध्ये त्यांनी त्याचा हिंदी रिमेक प्रदर्शित केला ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. (Photo: Prime Video)

  • 4/9

    रंगीला
    राम गोपाल यांचा १९९५ मध्ये आमिर खान, जॅकी श्रॉफ आणि उर्मिला मातोंडकर अभिनीत ‘रंगीला’ हा चित्रपट फक्त ४.५ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि सुमारे ३३.४ कोटी रुपये कमाई केली. (Photo: Prime Video)

  • 5/9

    सत्या
    राम गोपाल वर्मांचा १९९७ मध्ये आलेला ‘सत्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट झाला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे २.५ कोटी रुपये खर्च आले आणि चित्रपटगृहांमध्ये सुमारे १५ कोटींची कमाई झाली. (Photo: Sony Liv)

  • 6/9

    दिल से
    शाहरुख खान, मनीषा कोइराला आणि प्रीती झिंटा स्टारर ‘दिल से’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातील अनेक गाणी सुपरहिट झाली. सुमारे ११ कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘दिल से’ चित्रपटाने २८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. (Photo: Netflix)

  • 7/9

    शूल
    मनोज बाजपेयी आणि रवीना टंडन स्टारर चित्रपट शूलची निर्मिती राम गोपाल वर्मा यांनी केली होती. हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला. ‘शूल’ हा चित्रपट सुमारे ५ कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर सुमारे ८.५८ कोटी रुपये कमावले. (Photo: Prime Video)

  • 8/9

    कंपनी
    २००२ सालच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक म्हणजे राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘कंपनी’. आजही प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडतो. त्याचे बजेट सुमारे ९.५ कोटी रुपये होते आणि बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन सुमारे २५ कोटी रुपये होते. (Photo: Prime Video)

  • 9/9

    सरकार
    राजकीय आणि गुन्हेगारी थ्रिलर चित्रपट ‘सरकार’चे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, के के मेनन, कतरिना कैफ, तनिषा, सुप्रिया पाठक आणि इतर अनेक कलाकार होते. चित्रपटाचे बजेट सुमारे १४ कोटी रुपये होते आणि त्याने ३९ कोटी रुपये कमावले. (Photo: Prime Video) हेही पाहा- अमेरिकेच्या टेरिफ प्लॅनमागील मास्टरमाइंड कोण? ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही केलं आहे व्यापार धोरणांवर काम….

TOPICS
मनोरंजनEntertainmentराम गोपाल वर्माRam Gopal Varma

Web Title: From satya to sarkar 7 films that brought success to ram gopal varma spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.