-
तारक मेहता का उल्टा चष्मा ही लोकप्रिय मालिका सोनी सब टीव्हीवर तब्बल १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हलक्याफुलक्या विनोदांनी सजलेली ही मालिका अजूनही तितकीच आवडते. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
या मालिकेतील पात्रं आणि त्यांच्या गमतीजमती प्रेक्षकांच्या खूप जवळच्या झाल्या आहेत. दर वेळी नवे कथानक आणि भन्नाट प्रसंग यामुळे शो कायम नवा वाटतो. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
नवीन भागात गोकुळधामचे लोक एका पिकनिकसाठी भुताच्या बंगल्यात जातात. तिथे त्यांच्या गमतीसोबत थोडी भीतीही मिसळते आणि त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये चकोरी या भुताच्या भूमिकेत स्वाती शर्मा झळकली आहे. तिचा अभिनय प्रेक्षकांना इतका आवडला आहे की, ती चर्चेचा विषय ठरली आहे. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
स्वाती शर्मा केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती खूप ग्लॅमरसही आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
‘तारक मेहता…’पूर्वी स्वातीने २०२३ मध्ये प्राइम व्हिडीओवरील ‘यारण दियां पौ बारा’ या चित्रपटातही काम केले होते, ज्यातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. (फोटो : the_swati_sharma)
-
स्वाती शर्मा सध्या ‘शैतानी रस्मे’ या शोमध्ये सहायक भूमिकेत काम करत आहे. ‘तारक मेहता…’मधून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तिला आणखी मोठ्या संधी मिळतील, अशी चाहत्यांना आशा आहे. (छायाचित्र: the_swati_sharma)
-
स्वाती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ४३ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमी नवे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांशी जोडलेली असते. (छायाचित्र: the_swati_sharma)
तारक मेहताच्या ‘चकोरी’ने जिंकली प्रेक्षकांची मनं; कोण आहे ‘ही’ ग्लॅमरस अभिनेत्री?
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘चकोरी’ या भुताच्या भूमिकेत स्वाती शर्मा झळकली असून, तिचा अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावरही ती तितकीच चर्चेत आहे.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah tv serial actress swati sharma as chakori svk 05