-
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्वरी जोग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
-
नुकतेच शर्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले असून, त्यात तिचा नवा आणि शांत लूक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
-
या फोटोंमध्ये शर्वरीने सुंदर साडी परिधान केली असून, तिचं सौंदर्य आणि सहजता चाहत्यांना मोहवून टाकत आहे.
-
पुस्तक वाचताना किंवा खोल विचारात बुडालेली शर्वरी यामध्ये दिसून येते आणि तिचे हावभाव अधिकच उठून दिसत आहेत.
-
तिच्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक हास्य आणि प्रसन्नता या फोटोंमधून स्पष्ट जाणवते, ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू समोर येते.
-
साधेपणा, आत्मविश्वास आणि आत्ममग्नता अशा तिन्ही गोष्टींमुळे शर्वरीचा हा फोटोशूट चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
-
फोटो शेअर होताच नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला असून, अनेकांनी ‘सुंदरी’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
अभिनयाप्रमाणेच शर्वरीचा फॅशन सेन्सही तितकाच लक्षवेधी असून, तिच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो साभार- शर्वरी जोग /इन्स्टाग्राम)
Photos : ‘तू ही रे माझा मितवा’ फेम शर्वरी जोगच्या नव्या फोटोशूटने वेधलं लक्ष
स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्री शर्वरी जोगने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या मोहक फोटोंमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लाल साडीत शांतपणे पुस्तक वाचतानाचा तिचा सोज्वळ अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.
Web Title: Marathi television actress sharvari jog simple photoshoot viral svk 05