• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress nushrratt bharuccha royal anarkali look photoshoot viral svk

Photos: नुसरत भरुचाचा शाही अंदाज; पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसमधील लूकने वेधलं लक्ष

नुसरत भरुचा हिचा नव्या अंदाजातील शाही लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पारंपरिक अनारकली ड्रेस व त्यावरील लाल गुलाबांचे भरतकाम, सटल ग्लॅम मेकअप आणि सोज्वळ अदा यांमुळे तिचा लूक लक्ष वेधून घेतोय.

Updated: July 9, 2025 17:33 IST
Follow Us
  • Bollywood actress Nushrratt Bharuccha royal anarkali
    1/12

    बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा हिने नुकतेच एका नव्या लूकमधील फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

  • 2/12

    मरून रंगाच्या पार्श्वभूमीवर नुसरतने हाताने भरतकाम केलेला ऑफ-व्हाईट अनारकली गाऊन परिधान केला असून, तिचा हा रॉयल लूक लक्ष वेधून घेत आहे.

  • 3/12

    नुसरतच्या या लूकमधील शांत, सोज्वळ व आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतेय.

  • 4/12

    तिने ‘Dramatic entrances with less noise, more nuance’, अशी कॅप्शन देऊन एक खास संदेश दिलाय.

  • 5/12

    या लूकमध्ये तिचा मेकअप सॉफ्ट ग्लॅम लूक देणारा आहे. न्यूड टोन लिपस्टिक, बारीक आयलायनर व सटल स्मोकी आयशॅडो यांमुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्याला उठाव मिळतो. हायलाईट केलेले चीकबोन्स व मॅट फिनिश बेसने तिला एलिगंट लूक दिला आहे.

  • 6/12

    नुसरतचा गोंडस अंदाज, केसांतील गुलाबाचं फूल आणि ड्रेसच्या काठावरचं सुंदर भरतकाम साऱ्यांचं लक्ष वेधून घेतंय.

  • 7/12

    सध्या तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असून, अनेक सेलिब्रिटींसह फॅशनप्रेमींनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.

  • 8/12

    एका अभिनेत्रीला साजेशी असणारी ही शांत; पण उठावदार उपस्थिती फॅशनच्या जगतात एक उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

  • 9/12

    नुसरत भरुचा पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत आली असून, तिचा हा अंदाज लवकरच ट्रेंडिंग लूक ठरण्याची शक्यता आहे.

  • 10/12

    नुसरत भरुचा हिचा हा लूक येत्या फेस्टिव्ह किंवा वेडिंग सीझनसाठी एक स्टाईल गाईड ठरू शकतो.

  • 11/12

    पारंपरिकतेत ग्लॅमर आणि साधेपणात शोभा, यांचं हे उत्तम उदाहरण आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो सौजन्य : इनस्टाग्राम/नुसरत भरुचा)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress nushrratt bharuccha royal anarkali look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.