-
अभिनेत्री प्राजक्ताने नवा पारंपरिक लूक शेअर करीत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
मोत्यांच्या दागिन्यांनी सजलेला तिचा लूक आकर्षक आणि राजेशाही वाटत आहे.
-
तिने परिधान केलेली रेशमी साडी आणि सौम्य मेकअप यांमुळे तिच्या लूकला शालीनतेची झालर लाभली आहे
-
फोटोशूटसाठी खास पारंपरिक पार्श्वभूमी तयार करण्यात आली आहे. जुन्या काळचा अंदाज देणारा हा लूक अतिशय लक्षवेधी आहे.
-
प्राजक्ताने या पोस्टसाठी केवळ ‘मौक्तिक माळा…’ असं लिहिलं आहे.
-
या लूकमधील तिच्या मुद्रांमधून आत्मविश्वासासह शांतता दिसून येते.
-
फोटोच्या रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाईट अशा दोन्ही व्हर्जन्सनी फॅन्सना भुरळ घातली आहे.
-
. ( सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम )
Photos: ‘रेशमी साडी, मौक्तिक माळ’, प्राजक्त माळीचा पारंपरिक अंदाज; शेअर केले खास फोटो
अभिनेत्री प्राजक्ताने पारंपरिक रेशमी साडी आणि मोत्यांच्या दागिन्यांमध्ये फोटोशूट शेअर करीत शाही अंदाजात चाहत्यांची मनं जिंकली आहेत
Web Title: Marathi actress prajakta mali traditional saree look photoshoot viral svk 05