-
Happy Birthday Sanjay Jadhav: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक (Director), छायाचित्रकार (Cinematographer) आणि निर्माते (Producer) संजय जाधव (Sanjay Jadhav) यांचा आज (१८ जुलै) ५५ वा वाढदिवस आहे.
-
संजय जाधव यांनी कलाकारांबरोबर वाढदिवसचे खास सेलिब्रेशन (Happy Birthday Celebration) केले.
-
५५ व्या वाढदिवसानिमित्त मोठा चॉकलेट केक (Chocolate Cake) आणला होता.
-
संजय जाधव यांच्या वाढदिवासाच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव (Fans Wishes) केला आहे.
-
अनेक मराठी कलाकारांनी संजय जाधव यांच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा ३’ (Ye Re Ye Re Paisa 3) हा चित्रपट आज म्हणजेच त्याच्या वाढदिवासाच्या दिवशी प्रदर्शित झाला.
-
यापूर्वी या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
-
संजय जाधव यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात छायाचित्रकार म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे वळत एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले.
-
२००८ साली प्रदर्शित झालेला ‘चेकमेट’ (Checkmate) हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
-
संजय यांनी ‘दुनियादारी’ (Duniyadari), ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ (Pyaar Vali Love Story), ‘ये रे ये रे पैसा’ (Ye Re Ye Re Paisa), ‘तू ही रे’ (Tu Hi Re) अशा अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संजय जाधव/इन्स्टाग्राम)
Photos: ५५ वा वाढदिवस, मोठा केक..; संजय जाधव यांचं मराठी कलाकारांबरोबर खास सेलिब्रेशन!
संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा ३’ हा चित्रपट आज म्हणजेच त्याच्या वाढदिवासाच्या दिवशी प्रदर्शित झाला.
Web Title: Marathi director sanjay jadhav happy birthday celebration with actors cake family photos viral sdn