-
बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्रींचं आयुष्य केवळ सिनेमांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. त्यांनी व्यवसायाच्या जगातही आपली छाप सोडली आहे. त्यामध्ये रेस्टॉरंट व फूड इंडस्ट्रीसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात त्यांनी भक्कम स्थान निर्माण केलं आहे.
-
गौरी खान – ‘Tori’ (मुंबई) शाहरुख खान यांची पत्नी गौरी खान या इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रात नावाजलेल्या असल्या तरी त्यांनी ‘Tori’ नावाचं रेस्टॉरंटही सुरू केलं आहे. हे रेस्टॉरंट लॅटिन अमेरिकन क्युझिनसाठी ओळखलं जातं आणि ते मुंबईच्या वांद्रे परिसरात आहे. (सर्व फोटो सौजन्य : गौरी खान / इंस्टाग्राम)
-
मलायका अरोरा – Scarlett House (मुंबई) फॅशन आयकॉन मलायका अरोरा ही ‘Scarlett House’ या मॉडर्न युरोपियन रेस्टॉरंटमध्ये इन्व्हेस्टर आहे. हे रेस्टॉरंट मुंबईत आहे आणि सोशल मीडियावर त्या प्रचंड चर्चेत असतात. (सर्व फोटो सौजन्य : मलायका अरोरा / इंस्टाग्राम)
-
शिल्पा शेट्टी – ‘Bastian’ (मुंबई) शिल्पा शेट्टी हिचं ‘Bastian’ हे रेस्टॉरंट मुंबईतील सेलिब्रिटी हँगआउट म्हणून ओळखलं जातं. हे सीफूड आणि काँटिनेंटल क्युझिनसाठी प्रसिद्ध असून, या ठिकाणी अनेक बॉलीवूड स्टार्स नियमितपणे दिसतात. (सर्व फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी / इंस्टाग्राम)
-
मौनी रॉय – Badmaash टीव्ही व बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय यांनी मुंबईत Badmaash नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. हे कल्पक थीम, उष्ण कटिबंधीय (tropical) आणि चविष्ट मेनूसाठी ओळखलं जातं. मुंबईच्या खाद्यसंस्कृतीत ‘बदमाष’ रेस्टॉरंटने सध्या आपला खास ठसा उमटवला आहे. (सर्व फोटो सौजन्य : मौनी रॉय/ इंस्टाग्राम)
-
या सगळ्या अभिनेत्रींचं एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्या प्रसिद्धीचा वापर करून ब्रँड तयार केला. अभिनय क्षेत्रातील स्वत:च्या नावाचा दबदबा वा वलयांकित ओळख, सोशल मीडियावरील प्रभाव आणि दर्जेदार सेवा यांच्या जोरावर त्यांची रेस्टॉरंट्स प्रचंड लोकप्रिय झाली आहेत.
अभिनयासोबत यशस्वी उद्योजिका ठरलेल्या ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींची रेस्टॉरंट्स झालीयत चर्चेचा विषय
गौरी खानपासून शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक अभिनेत्री रेस्टॉरंट व्यवसायातही यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या ब्रँड्सना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
Web Title: Famous bollywood actress restaurants in mumbai and india svk 05