-
साऊथ आणि बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने आणि मनमोहक सौंदऱ्यानं अनेकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे जिनिलीया देशमुख.
-
अभिनयाने चर्चेत राहणारी जिनिलीया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. जिनिलीयाने काही दिवसांपुर्वी चाहत्यांशी संवाद साधला होता.
-
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील आस्क मी सेशनद्वारे चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितलं. तेव्हा एका चाहत्याने जिनिलीयाला चक्क लग्नाची मागणी घातली होती.
-
जिनिलीयाला चाहत्याने “माझं तुझ्यावर प्रेम आहे, लग्न करशील का?” असं विचारत थेट लग्नाची मागणी घातली होती.
-
यावर जिनिलीयाने “मी विचार केला असता; पण माझं सर्वात सुंदर व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे” असं उत्तर दिलं होतं.
-
दरम्यान, रितेश-जिनिलीयाकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघे अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात.
-
जिनिलीयाचा नुकताच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील जिनिलीयाच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
याशिवाय लवकरच रितेश-जिनिलीया यांचा ‘वेड’ चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे; याबद्दल स्वत: जिनिलीयानेच खुलासा केला आहे.
माझ्याशी लग्न करशील? चाहत्याने जिनिलीया देशमुखला घातली होती लग्नाची मागणी, अभिनेत्रीने दिलेलं ‘हे’ उत्तर
इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी’ सेशनद्वारे एका चाहत्याने जिनिलीया देशमुखला घातली होती लग्नाची मागणी
Web Title: Genelia deshmukh fan proposed her on social media what she answered know more ssm 00