-
सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी (१६ ऑगस्ट) निधन झाले. आज पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांनी नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांच्या कामाचा ठसा उमटवला.
-
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ज्योती चांदेकर या आई होत्या. दरम्यान ज्योती चांदेकरांचे फेसबूकवर काही फोटो पोस्ट केलेले आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात..
-
हा फोटो त्यांच्या तरुणपणातला आहे. ‘९० मधला फोटो’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलेलं आहे.
-
तर हा फोटो त्यांच्या ‘अग्निपंख’ नाटकातला आहे.
-
हा फोटो पोस्ट करताना त्यांनी ‘असंच’, हे कॅप्शन दिलं होतं
-
‘रखेली’ या नाटकातला हा फोटोही त्यांच्या फेसबूकवर पाहायला मिळतो.
-
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचा फोटोही त्यांनी शेअर केला होता.
-
ज्योती चांदेकर यांचे गाजलेले मराठी चित्रपट
गुरू (२०१६), ढोलकी (२०१५), तिचा उंबरठा, दमलेल्या बाबाची कहाणी, पाऊलवाट (२०११), मी सिंधुताई सपकाळ (२०१०), सलाम (२०१४), सांजपर्व (२०१४) -
त्या सध्या स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करत होत्या. त्यांच्या निधनाने सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. (सर्व फोटो साभार- ज्योती चांदेकर फेसबूक पेज, इन्स्टाग्राम पेज) हेही पाहा- Photos: प्रियदर्शिनी इंदलकर व अभिनय बेर्डेच्या फोटोंची चर्चा; ‘या’ मराठी सिनेमात दिसणार एकत्र
ज्योती चांदेकरांच्या फेसबूकवरच्या काही आठवणी; ‘या’ मराठी चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका
Jyoti Chandekar Death: त्यांनी नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांच्या कामाचा ठसा उमटवला.
Web Title: Late actress jyoti chandekar s some facebook posts marathi movie list tejaswini pandit spl