-
अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जुहू समुद्रकिनाऱ्यावर दिव्यज फाऊंडेशनच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
-
या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, लेक दिविजा फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार आणि महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सहभाग घेतला.
-
समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने स्वयंसेवक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते. सर्वांनी मिळून गणेश विसर्जनानंतर किनाऱ्यावर साचलेला कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले.
-
या स्वच्छता मोहिमेचा उद्देश फक्त गणेशोत्सवानंतरची स्वच्छता करणे नसून वर्षभर किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करणे हा होता.
-
“चला, वर्षभर आपले समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम एक पाऊल म्हणून घेऊया” असे आवाहन दिविजा फडणवीस हिने आपल्या पोस्टमधून केले.
-
दिविजा फडणवीस हिने या उपक्रमाचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत “आमच्या सुंदर जुहू समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेत योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल @divyajfoundation चे आभार” असे कॅप्शन दिले.
-
अभिनेता अक्षय कुमारनेही किनाऱ्यावर स्वतः कचरा गोळा करून नागरिकांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
-
“पुढील गणेश चतुर्थी अधिक पर्यावरणपूरक व्हावी आणि आपल्या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य जपले जावे”, अशी अपेक्षा व्यक्त करत मोहिमेचा समारोप करण्यात आला.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिविजा फडणवीस/इन्स्टाग्राम)
Photos: मुख्यमंत्र्यांची लेक दिविजा फडणवीस हिने पर्यावरणपूरक संदेश देत फोटो केले शेअर, पोस्टमध्ये म्हणाली…
मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस, लेक दिविजा फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार आणि महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांचा जुहू समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता उपक्रमात सहभाग
Web Title: Cm devendra fadnavis daughter divija fadnavis juhu beach cleaning photo post on social media svk 05