-

मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री अनुजा साठे आणि अभिज्ञा भावे या पुन्हा एकदा एकत्र आल्या आहेत.
-
दोघींनी एकत्र काम केलेली ‘लगोरी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली होती आणि आता ढोल-ताशांच्या गजरात त्यांची जोडी पुन्हा उजळली आहे.
-
अनुजा साठेने पुण्यातील प्रतिष्ठित ढोल-ताशा पथकासोबत सहभाग घेतला असून तिच्या पारंपरिक वेशभूषेतील फोटोला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
-
ढोल-ताशाच्या गजरात हातात ढोल घेऊन उभ्या असलेल्या अनुजाच्या या छायाचित्राने तिचा कलावंती पथकातील उत्साह आणि ऊर्जा स्पष्टपणे जाणवते.
-
दरम्यान, अभिज्ञा भावे हिनेदेखील याच पथकातील आनंदी क्षण सोशल मीडियावर शेअर करत अनुजासोबतची मैत्री जपली आहे.
-
‘मैत्री’ या एका शब्दात अभिज्ञाने दिलेले कॅप्शन चाहत्यांच्या भावनांना भिडले असून अनुजा-अभिज्ञाच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा प्रत्यय त्यातून आला आहे.
-
‘लगोरी’ मालिकेतून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अनुजा आणि अभिज्ञा आता पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरात रंगल्या असून, चाहत्यांसाठी ही दृश्ये नॉस्टॅल्जियाचा खास क्षण ठरत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनुजा साठे/ इंस्टाग्राम)
Photos: ‘लगोरी’ मालिकेतील मैत्रिणी पुन्हा एकत्र कलावंती ढोल-ताशा पथकात पारंपरिक अंदाज
कलावंती ढोल-ताशा पथकात सहभागी होत अनुजा आणि अभिज्ञाने जपली मैत्री, मालिकेतील सहकलाकारांना आठवण करून दिला खास क्षण
Web Title: Abhidnya bhave and anuja sathe kalawanti dhol tasha pathak traditional look svk 05