-
नवरात्रीचा आठवा दिवस मोरपंखी रंगाला समर्पित मानला जातो. या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने मोरपंखी निळसर हिरव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
तिच्या या पारंपरिक अवतारात मराठमोळेपणाची झलक स्पष्ट दिसत असून, नवरात्रीचा उत्साह अधिक खुलून दिसतो आहे.
-
झगमगत्या गुलाबी ब्लाऊजसोबत मोरपंखी रंगाची सिल्क साडी तिने नेसली असून, या साडीच्या सोनेरी बॉर्डरमुळे तिच्या लूकला राजेशाही टच मिळाला आहे.
-
गळ्यातील मोत्यांचा हार, कानातील झुमके आणि पारंपरिक नथ घालून तेजस्विनीने आपला नवरात्रीचा साज अधिकच सुंदर केला आहे.
-
नथीमुळे तिच्या चेहऱ्यावरील गोडवा अधिक खुलला असून, तिच्या स्मितामुळे संपूर्ण फोटोशूटला सणासुदीचा माहोल प्राप्त झाला आहे.
-
काळ्या-हिरव्या बांगड्यांचा हातातील साज, सोन्याचे दागिने आणि नवरात्रीला शोभणारा पारंपरिक लूक हे सगळं तिच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसत आहे.
-
तेजस्विनीच्या चेहऱ्यावरचे आत्मविश्वासपूर्ण स्मितहास्य आणि नजरेतील तेज तिच्या नवरात्रीच्या या लूकला अधिक आकर्षक बनवत आहे.
-
नवरात्रीच्या प्रत्येक रंगाला वेगळी ओळख असते आणि मोरपंखी रंगाच्या या पारंपरिक अविष्कारातून तेजस्विनी लोणारीने उत्सवातील पारंपरिकतेची आणि सौंदर्याची सांगड घातली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/ इंस्टाग्राम)
Navratri Day 8: नवरात्रीच्या आठव्या दिवशी तेजस्विनी लोणारीचा मोरपंखी रंगाच्या साडीत पारंपरिक लूक
मोरपंखी रंगाची साडी, झगमगते दागिने आणि मोहक स्मितहास्याने अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा नवरात्रीच्या सणासुदीचा अंदाज खुलला
Web Title: Marathi actress tejaswini lonari morpankhi colour traditional saree look photoshoot viral svk 05