-

मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा (Tejaswini Lonari) शिवसेना युवा नेते समाधान सरवणकरबरोबर (Samadhan Saravankar) साखरपुडा पार पडला.
-
समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर (Shiv Sena Leader Sada Sarvankar) यांचे पुत्र आहेत.
-
समाधान यांनी इन्स्टाग्रामवर साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना समाधान यांनी ‘एक नवीन सुरुवात, एक नवं आयुष्य देणारा हा क्षण, भावनांच्या ओघात गुंफलेला हा सुंदर प्रवास, जेव्हा मी आणि तू म्हणत चाललो होतो, आज आपण झालो, आणि कायमचे एक झालो… हा क्षण म्हणजे ..आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या प्रेमाची सुरूवात!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
साखरपुड्यासाठी तेजस्विनीने लाल रंगाची भरजरी साडी (Red Saree Look) नेसली होती.
-
समाधान यांनी साखरपुड्यासाठी पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सूट (Jodhpuri Suit) परिधान केला होता.
-
मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये समाधान व तेजस्विनी यांचा साखरपुडा पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : समाधान सरवणकर व तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
‘एक नवं आयुष्य देणारा..’ म्हणत समाधान सरवणकर यांनी शेअर केले साखरपुड्यातील खास फोटो
Samadhan Sarvankar Tejaswini Lonari Engagement Photos: मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये समाधान व तेजस्विनी यांचा साखरपुडा पार पडला होता.
Web Title: Tejaswini lonari engagement husband samadhan saravankar special post shared inside photos viral sdn