-   ‘लक्ष्मी निवास’ मधील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधवने नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे. 
-  मेघन जाधवची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आहे. 
-  कलाकारांनी सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. 
-  त्यांचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. तर अनेकांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीर केल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये चाहत्यांसह काही कलाकारांचादेखील समावेश आहे. 
-  मेघन आणि अनुष्का यांनी काही दिवसांपूर्वी एकत्र मिळून फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला आहे. ‘Marry & Adore’ असे त्यांच्या व्यवसायाचे नाव आहे. 
-  अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे तर ती सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत आहे. 
-  अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ ती शेअर करते. 
-  आता हे कलाकार लग्नबंधनात कधी अडकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 
-  मेघन आणि अनुष्का या दोघांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. (सर्व फोटो सौजन्य: अनुष्का पिंपुटकर आणि मेघन जाधव इन्स्टाग्राम) 
‘लक्ष्मी निवास’ फेम जयंतची गर्लफ्रेंड कोण आहे? स्टार प्रवाहच्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतेय काम
Meghan Jadhav and Anushka Pimputkar Photos: अभिनेता मेघन जाधव व त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो पाहिलेत का?
Web Title: Lakshmi niwas fame meghan jadhav aka jayant shares photo with girlfriend anushka pimputkar revealed about relationship with lagnanantar hoilach prem fame actress nsp