-   मराठी टीव्ही आणि सिनेमांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सिया पाटील. 
-  काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री सिया पाटीलनं पुण्यात नवीन घर घेतलं. 
-  दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सियानं नवीन घर घेतलं असून या घराची खास झलक शेअर केली. 
-  सियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या घराचे फोटो शेअर केले. तसंच व्हिडीओसुद्धा शेअर केले होते. 
-  या व्हिडीओवर तिनं ‘देवघर’, ‘नवीन घर’, ‘पुणे’ आणि ‘ॐ नम: शिवाय’ असे हॅशटॅग दिले होते. 
-  सियानं स्वत:च्या हातांनी या नव्या घरात देवपूजा केली. याचे खास क्षण तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमधून पाहायला मिळालं. 
-  सियाच्या घराला प्रशस्त हॉल आहे. तसंच घरात ठिकठिकाणी आकर्षक शोभेच्या वस्तूही ठेवलेल्या आहेत. 
-  सियाच्या या प्रशस्त घराला छोटीशी बाल्कनीसुद्धा आहे. बाल्कनीही सुंदर रित्या सजवली आहे. 
-  सिया ही मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मराठीसह हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीतही तिनं काम केलं आहे. (फोटो सौजन्य : व्हिडीओतून स्क्रीनशॉट) 
प्रशस्त हॉल, सुंदर बाल्कनी अन् आकर्षक शोभेच्या वस्तू…; मराठमोळ्या अभिनेत्रीनं पुण्यात घेतलंय आलिशान घर; पाहा फोटो
मराठमोळ्या अभिनेत्रीनं पुण्यात घेतलंय प्रशस्त घर, शेअर केली खास झलक; पाहा फोटो
Web Title: Siya patil buys new home in pune share photos and videos on social media ssm 00