-   ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये मराठमोळ्या त्रिशा ठोसरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. नुकत्याच झालेल्या भागात त्रिशाचं नाव झळकलं. 
-  अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय शोमध्ये सहा वर्षांच्या त्रिशासंबंधित २५ लाख रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला. 
-  रचित उप्पल यांना शोमध्ये ‘२०२५ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनली?’ हा प्रश्न विचारला गेला. 
-  रचित यांना प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत नसल्यानं त्यांनी ‘प्रेक्षक पोल’ (Audience Poll) या लाईफलाईनचा वापर केला. 
-  Audience Poll या लाईफलाइनमध्ये रचित यांना प्रेक्षकांनी मदत करत ‘A – त्रिशा ठोसर’ हा उत्तराचा योग्य पर्याय सुचवला. 
-  वयाच्या सहाव्या वर्षी त्रिशा ठोसरनं राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. ‘नाळ-२’साठी त्याला हा पुरस्कार मिळाला. 
-  या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात त्रिशानं शाहरुख खानसह अनेक बॉलीवूड कलाकारांबरोबर फोटो काढले. (सर्व फोटो : त्रिशा ठोसर/इन्स्टाग्राम) 
-  दरम्यान, येत्या ३१ ऑक्टोबर रोजी त्रिशाची मुख्य भूमिका असलेला ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 
KBC शोमध्ये झळकलं सहा वर्षांच्या मराठमोळ्या त्रिशा ठोसरचं नाव; २५ लाखांसाठी विचारला ‘हा’ प्रश्न
अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये विचारला त्रिशा ठोसरबाबत प्रश्न
Web Title: Kbc show asks question about treesha thosar regarding national award ssm 00