• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 10 tips and tricks for mobile photography asy

या ट्रिक व टिप्स वापरा आणि बना मोबाईल फोटोग्राफर

February 14, 2020 20:04 IST
Follow Us
  • हल्लीच्या काळात मोबाईल कॅमेरा वापरणं ही नित्याची बाब झाली आहे. उत्तम कॅमेरा असलेल्या मोबाईल सोबतच तुम्हाला फोटो देखील उत्तम प्रकारे काढता आले तर तुम्ही काढलेला फोटो नक्कीच आकर्षक असेल. म्हणूनच जाणून घेऊया काय आहेत मोबाईल फोटोग्राफीच्या ट्रिक्स.
    1/11

    हल्लीच्या काळात मोबाईल कॅमेरा वापरणं ही नित्याची बाब झाली आहे. उत्तम कॅमेरा असलेल्या मोबाईल सोबतच तुम्हाला फोटो देखील उत्तम प्रकारे काढता आले तर तुम्ही काढलेला फोटो नक्कीच आकर्षक असेल. म्हणूनच जाणून घेऊया काय आहेत मोबाईल फोटोग्राफीच्या ट्रिक्स.

  • 2/11

    १) लाईटिंग – फोटोग्राफी मध्ये लाईटिंग हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मोबाईल फोटोग्राफी करताना रिफ्लेक्टिव्ह लाईटचा विचार करा.( उदा. काचेच्या इमारतीचे रिफ्लेक्टशन ). तसेच वस्तूंवर पडणाऱ्या सूर्याच्या सावलीचा विचार करणे सुद्धा फार महत्वाचे आहे. सूर्योदय किंवा सूर्यास्तच्या वेळी सराव करा.

  • 3/11

    २) झुमिंगवर लक्ष ठेवा – मोबाईलवर फोटोग्राफी करताना झुमिंगवर खास लक्ष ठेवा. तुम्हाला एखाद्या वस्तूचा फोटो काढायचा असल्यास मोबाईल कॅमेरा झूम न करता स्वतःला मूव्ह करा. मोबाईल कॅमेरा झूम करून फोटो काढल्यास फोटो क्लिअर येत नाहीत.

  • 4/11

    ३) मूव्हींग ऑब्जेक्ट क्लिक करताना मोबाईल स्थब्ध ठेवा. – मुव्हींग ऑब्जेक्टचा फोटो काढताना मोबाईल स्टेबल राहण्यासाठी ट्रायपॉडचा वापर करू शकता.

  • 5/11

    ४) ऍप्सचा उपयोग – मोबाईल फोटोग्राफीच्या उत्तम फोटो मागे मोबाईल मध्ये असलेले विविध ऍप्स हे मुख्य कारण आहे. फोटो काढल्यानंतर एडिट मोडचा वापर करून तुम्ही फोटोला नवीन लुक देऊ शकता.

  • 6/11

    ५) कॅमेरा लेन्स स्वच्छ ठेवा – यामुळे फोटो स्वच्छ आणि शार्पर येण्यास मदत होते. फोटो लेन्स स्वच्छ नसल्यास फोटो क्लिअर येत नाहीत.

  • 7/11

    ६) फ्लॅशचा वापर विविध प्रकारे करा – मोबाईलचा फ्लॅश डिजिटल कॅमेरा इतका चांगला नसला तरी मोबाईल फ्लॅश योग्य प्रकारे वापरून तुम्ही उत्तम फोटो काढू शकता. फ्लॅश आणि विदाऊट फ्लॅशचे फोटो काढून तुम्ही चाचणी करू शकता.

  • 8/11

    ७) कॅमेराचा फोकस सेट करा – मोबाईलचा कॅमेरा ऑटोमॅटिक ऑब्जेक्ट फोकस करतो परंतु अनेक ऑब्जेक्ट मधील एखादा ऑब्जेक्ट फोकस करण्यासाठी मोबाईल स्क्रीन वर टॅप केल्यास फोटो अधिक क्लिअर येतो.

  • 9/11

    ८) कॅन्डीड फोटो कॅप्चर करा – तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींसोबतचे क्षण अविस्मरणीय करायचे असतील तर कॅन्डीड फोटो हा उत्तम पर्याय आहे. अचानक लक्ष नसताना काढलेले हे फोटो दिसायला नैसर्गिक आणि आकर्षक दिसतात.

  • 10/11

    ९) फोटोच्या अँगल वर लक्ष द्या – तुम्ही फोटो कोणत्या अँगल ने काढता यावरून तुमचा फोटो काढण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. तुम्हाला उत्तम अँगलने फोटो काढायचा असेल तर कशी तुम्हाला उंचावरून काढावा लागेल तर कधी जमिनीवरून. अशा प्रकारे तुम्ही अँगलचा विचार करून उत्तम फोटो काढू शकता.

  • 11/11

    १०) संख्येपेक्षा दर्जा महत्वाचा – खूप सारे फोटो कसेही फोटो काढण्यापेक्षा वेळ घेऊन कमी पण चांगले फोटो क्लिक करा.

Web Title: 10 tips and tricks for mobile photography asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.